Video Viral Sakal
Trending News

Video Viral : प्राण्यांचा अजय देवगण! म्हशींच्या पाठीवर कुत्रा; 'फूल और काँटे' स्टाईल केली थाटात एंट्री

हा सीन पाहून तुम्हालाही अजय देवगणच्या फूल और काँटे या चित्रपटाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. एक मनोरंजनाचे साधन म्हणून सोशल मीडिया आता समोर आला आहे. यावर रील, शॉर्ट्स, व्हिडिओच्या माध्यमातून मनोरंजन होत असते. सध्या दोन म्हशींचा आणि एका कुत्र्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून यावर अनेक नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका गावातील असून दोन म्हशी रस्त्यावरून जात असताना त्यांच्या पाठीवर एक कुत्रा उभा असल्याचं दिसत आहे. त्याने दोन्ही म्हशीच्या पाठीवर दोन दोन पाय दिले असून थाटात एंट्री केली आहे. हा सीन पाहून तुम्हालाही अजय देवगणच्या फूल और काँटे या चित्रपटाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान, फूल और काँटे या चित्रपटामध्ये अजय देवगण दोन दुचाकीवर एक एक पाय ठेवून प्रवास करणारा सीन प्रत्येकाच्या आठवणीत असेल. तसाच काहीसा स्टंट या कुत्र्याने केला असून अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा कुत्रा आणि म्हशी एकाच मालकाने पाळलेल्या असल्याचं मत नेटकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. "हा तर प्राण्यांचा अजय देवगण आहे" अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर नेटकऱ्यांनी या व्हिडिओला चांगलीच पसंती दर्शवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : पावसाची पुन्हा एन्ट्री! राज्यातील ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट; तुमच्या भागात कसे असेल हवामान ?

Cutlet Paratha: एकदा बनवाल तर घरच्यांची फर्माईश ठरलेली! असा बनवा स्वादिष्ट कटलेट पराठा

आजचे राशिभविष्य - 29 सप्टेंबर 2026

US-China Trade Deal : अमेरिका-चीन ट्रेड वॉरला ब्रेक! ६० अब्ज डॉलरच्या व्यापारावर मोठा निर्णय, भारताची चिंता वाढली ?

अस्थिबोध : अवघड शस्त्रक्रिया; पण नियोजन अचूक!

SCROLL FOR NEXT