Video  Sakal
Trending News

Video : लाली, गॉगल, झूला पांघरून शेळ्या नटल्या! अकोल्यात रंगला शेळ्यांचा मॉडेल शो; बघ्यांची गर्दी

या कार्यक्रमासाठी प्रेक्षकांचीही चांगलीच गर्दी जमा झाली होती.

सकाळ डिजिटल टीम

अकोला : तरूणांचा किंवा तरूणींचा मॉडेल शो आपण अनेकदा पाहिला असेल. नटून थटून आलेल्या तरूणी आणि त्यांचे व्यासपीठावरील वॉक प्रेक्षकांना आकर्षित करत असतो. पण महाराष्ट्रातील अकोल्यात चक्क शेळ्यांचा फॅशन शो आयोजित करण्यात आला आहे. हे वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शेळ्यांच्या मालकांनी शेळ्यांना चांगलंच सजवलं आहे. त्यामध्ये त्यांची रंगरंगोटी, लिपस्टिक, गॉगल, फुगे, झूल, त्यांच्या पायात गोंडे आणि वाजत गाजत मिरवणूक अशी या कार्यक्रमाची रूपरेषा होती. त्यांच्या वॉकसाठी सुद्धा वेगळा मार्ग तयार करण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतल्या अनेक शेळी मालकांनी सहभाग घेतला होता. तर प्रेक्षकांचीही चांगलीच गर्दी जमा झाली होती. अकोला जिल्ह्यातील अकोट मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.

अधिक माहितीनुसार, या फॅशन शो मध्ये ६० पेक्षा अधिक शेळ्यांनी सहभाग घेतला होता. त्या यासाठी मॉडेल बनल्या होत्या. अकोट जेसीआय या संघटनेने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाच्या पोस्टरवर कृषी अर्थव्यवस्थेत बकरीचं महत्व सांगणारे वाक्य लिहिण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alphonso Mango Price Drop in Ratnagiri : डझनाला 1500 ते 2000 रुपयांना विकला जाणारा 'हापूस' रत्नागिरीत 400 रुपये डझन; बाजारात आवक वाढल्याने घसरले दर

IPL 2026: दिल्ली कॅपिटल्स रोखणार बंगळुरूचा झंझावात? यजमान संघाला गोलंदाजांकडून अपेक्षा; पाहा संभावित Playing XI

Latest Marathi News Live Update : आमदार गायकवाडांच्या घरावर उद्या मोर्चा; भाकप कार्यकर्ते आज होणार बुलढाण्याला रवाना

Solapur Crime: साेलापूरात दारूच्या नशेत खून केला अन्‌ उतरल्यावर ठाण्यात हजर; लाथ लागल्याच्या रागातून डोक्यात घातला दगड..

Pune Accident: ड्रेनेज स्वच्छ करताना तिघांचा गुदमरून मृत्यू; पुरंदर तालुक्यातील घटना, कामगार ड्रेनेजमध्ये उतरले अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT