Amazon company delivery boy on strike for 3 days in Pune district Sakal
Trending News

Amazon Shopping: १० वर्षांपूर्वी सुरू झाली होती Amazon; सुरुवातीच्या वर्षांमध्ये विकलेल्या १० गोष्टी कोणत्या? जाणून घ्या....

जेव्हा १० वर्षांपूर्वी भारतामध्ये अ‍ॅमेझॉनची सुरुवात झाली, तेव्हा कदाचित कोणी विचारही केला नसेल की ई-कॉमर्सच्या क्षेत्रामध्ये इतकी प्रगती होईल आणि लोक त्यावर एवढे अवलंबून असतील.

वैष्णवी कारंजकर

अ‍ॅमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग कंपनीने भारतीय बाजारपेठेमध्ये प्रवेश करून १० वर्षे पूर्ण झाली आहे. ई-कॉमर्सच्या क्षेत्रातल्या टॉप साईट्सपैकी एक असलेल्या अ‍ॅमेझॉनने २०१३ साली भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आणि गेल्या १० दिवसांमध्ये लोकांची शॉपिंगची पद्धतच बदलली.

अ‍ॅमेझॉनने ५ जून २०१३ मध्ये भारतामध्ये प्रवेश केला. सुरुवातीच्या दिवसांमध्ये या साईटवरुन अगदी मर्यादित प्रॉडक्ट्स विकले जात होते. पण कालांतराने यामध्ये वाढ झाली. भारतामध्ये कोणत्या वस्तू विकल्या जातील, याबद्दल या कंपनीने अभ्यास केला. भरपूर वेळ घेऊन अ‍ॅमेझॉनने भारतीय बाजारपेठ लक्षात घेतली आणि त्यानंतर इथे आपला विस्तार केला. आज अ‍ॅमेझॉननवरुन तुम्ही किराणा मालापासून ते मोठमोठे टीव्ही फ्रीजही खरेदी करू शकता.

जेव्हा १० वर्षांपूर्वी भारतामध्ये अ‍ॅमेझॉनची सुरुवात झाली, तेव्हा कदाचित कोणी विचारही केला नसेल की ई-कॉमर्सच्या क्षेत्रामध्ये इतकी प्रगती होईल आणि लोक त्यावर एवढे अवलंबून असतील. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये या साईटवर विविध गॅजेट्स, पुस्तकं, सीडी आणि इतर काही उत्पादनं होती. आज आम्ही तुमच्यासोबत अशा काही गोष्टी शेअर करणार आहोत, ज्या अगदी सुरुवातीला अ‍ॅमेझॉनच्या माध्यमातून भारतामध्ये उपलब्ध होत्या.

  1. पायल गिडवानी तिवारी यांचं पुस्तक - फ्रॉम XL टू XS: अ फिटनेस गुरुज गाईड टू चेंजिंग युअर बॉडी

  2. सोनी वायर्ड हेडफोन - MDR-EX10LP-WHT4

  3. सीडी - डीव्हीडी विभागामध्ये टॅक्सी ड्रायव्हर, नौ दो ग्यारह, हाऊस नं. ४४ या सीडीजचा समावेश होता.

  4. प्रीती सोनी यांचं पुस्तक - लाईफ इज व्हॉट यू मेक इट

  5. ई-रीडर किंडल - हे ६ इंचाचं डिव्हाईस होतं. यामध्ये ई- इंक डिस्प्ले आणि वायफाय सुविधाही होती.

  6. रश्मी बन्सल यांचं डिजिटल बुक - स्टे हंग्री स्टे फुलिश

  7. काय पो चे या चित्रपटाची डिव्हीडी

  8. ऑलिम्पस 8x40 DPS दुर्बिण

  9. क्रिएटिव्ह झेन स्टाईल MP3 व्हिडीओ प्लेयर

  10. JBL - जम्बो टू पीस एंटरटेनमेंट स्पीकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar : ''...त्यावेळी आज आपणच पेरलेल्या विषाची जाणीव त्यांना होईल, पण वेळ मात्र गेलेली असेल''

ENG vs IND: टीम इंडियाने बुमराहशिवाय दोन्ही कसोटी जिंकल्या! सचिन तेंडुलकर म्हणाला, 'त्याने सुरुवात चांगली...'

Trump Tariff India Response: ट्रम्प यांच्या अतिरिक्त टॅरिफवर आता भारतानेही स्पष्ट केली भूमिका अन् दिलं सडेतोड प्रत्युत्तर!

Tutari Express: तुतारी एक्स्प्रेसमुळे प्रवाशांचा खोळंबा, वेळापत्रकात बदल करण्याची मागणी

Virar News : अर्नाळा किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी वाचवले आठ जणांचे प्राण; माजी आमदार क्षितिज ठाकूर यांनी केला जीवरक्षकांचा सत्कार

SCROLL FOR NEXT