Ambani Family  esakal
Trending News

Mukesh Ambani Family : कोण आहेत मुकेश अंबानींचे गुरु? ज्यांच्या सल्ल्याने घेतला जातो प्रत्येक लहान मोठा निर्णय

Mukesh Ambani's Guru: असेच एक गुरु अंबानी कुटुंबातील आहेत, त्यांचे नाव रमेश भाई ओझा आहे

सकाळ ऑनलाईन टीम

Ambani Family : मुकेश अंबानी यांचेही नाव देशातील आणि जगातील सर्वात मोठ्या उद्योगपतींच्या यादीत समाविष्ट आहे. व्यवसायाच्या क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा दबदबा कायम आहे. असे म्हणतात की जीवनात यश मिळवण्यासाठी गुरु असणे अत्यंत आवश्यक आहे. असेच एक गुरु अंबानी कुटुंबातील आहेत, त्यांचे नाव रमेश भाई ओझा आहे. अंबानी कुटुंब प्रत्येक लहान-मोठा निर्णय त्यांच्या सल्ल्याने घेते. चला, जाणून घेऊया त्यांच्याबद्दल.

अंबानी कुटुंबाचे गुरू रमेश भाई ओझा हे एक प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु आहेत. ते गुजरातमधील पोरबंदरमध्ये एक आश्रम चालवतात, ज्याचे नाव 'सांदिपनी विद्यानिकेतन आश्रम' आहे.

धीरूभाई अंबानी जेव्हा यशाच्या शिखरावर होते तेव्हापासून रमेश भाई ओझा अंबानी कुटुंबासोबत आहेत. अंबानी कुटुंबासाठी त्यांचे महत्त्व अतुलनिय आहे. कुटुंबाच्या प्रत्येक लहान-मोठ्या निर्णयात रमेश भाई ओझा यांचा सल्ला महत्वाचा असतो.

Mukesh Ambani Family

असे म्हटले जाते की मुकेश अंबानी आपल्या व्यवसायात कोणतीही नवीन गोष्ट करण्यापूर्वी आपल्या गुरूचा सल्ला घेतात. रिपोर्ट्सनुसार, जेव्हा मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांच्यात बिझनेसबाबत चढ-उतार होत होते, तेव्हा त्यांच्या गुरूंनीच योग्य मार्ग दाखवला होता.

असे म्हणतात की धीरूभाई अंबानी यांच्या पत्नी कोकिलाबेन अनेकदा त्यांचे व्हिडिओ पाहत असत. त्यांच्यामुळे प्रभावित होऊन 1997 मध्ये त्यांनी रमेश भाई ओझा यांना त्यांच्या घरी 'राम कथा' आयोजित करण्यासाठी आमंत्रित केले. आठवडाभरानंतर त्यांचे अंबानी कुटुंबाशी संबंध सुधारले होते. हळूहळू ते या घराण्याचे गुरू झाले. (Mukesh Ambani)

केवळ अंबानी कुटुंबच नाही तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातचे सर्व मोठे नेते त्यांच्या आश्रमात गेले आहेत. त्यांचे आश्रय आणि त्यांचे नाव देशभरात प्रसिद्ध आहे. त्यांच्या आध्यात्मिक विचारांनी प्रभावित होऊन सातासमुद्रापलीकडूनही त्यांचे भक्त त्यांना भेटायला येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ESIC New Rules 2026 : कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! आजारपण आणि प्रसूती लाभांसाठी अर्जाची गरज नाही; पैसे थेट बँक खात्यात जमा होणार

Gadchiroli History: गडचिरोलीच्या घनदाट जंगलात इतिहासाचा खजिना! १६व्या-१७व्या शतकातील ५० वीरगळांचा शोध, शूरवीरांच्या पराक्रमाची शिल्पे उजेडात

IND A vs PAK A: भारत पाकिस्तान सामन्यात टॉसवेळी नेमकं काय घडलं? होत, मॅच रेफ्रींच्या चुकीमुळे वाद, पाकिस्तानी चाहत्यांनी केले आरोप

Water Security 2051 : पुणे महानगर प्रदेशाच्या पाणीपुरवठ्याचे दीर्घकालीन नियोजन; जलसंपदा विभागाचा २०५१ पर्यंतचा जलसुरक्षा आराखडा तयार होणार

Palodwadi Robbery: पालोदवाडीत चार चोरट्यांचा धुमाकूळ; चार घरांवर दरोडा, महिलांच्या गळ्याला चाकू लावून ३.३२ लाखांचा ऐवज लुटला

SCROLL FOR NEXT