Anand Mahindra X post eSakal
Trending News

Viral Video : दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी, तेही दुचाकीवर.. कसं शक्य आहे? आनंद महिंद्रानी शेअर केला व्हिडिओ

Anand Mahindra : या व्हिडिओमध्ये दिसतंय, की काही जण मिळून एक मोठं कपाट एका जुन्या स्कूटरवर ठेवत आहेत.

Sudesh

Anand Mahindra Viral Video : देशातील मोठ्या उद्योजगांपैकी एक असणारे आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अ‍ॅक्टिव्ह असतात. आपल्या एक्स हँडलवरुन ते नेहमीच व्हायरल व्हिडिओ शेअर करत असतात. यावर ते कित्येक वेळा मिश्किल टिप्पणी देखील करतात.

शुक्रवारी आनंद महिंद्रांनी असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसतंय की एक व्यक्ती चक्क आपल्या दुचाकीवरुन भलं मोठं कपाट घेऊन जातो. हा व्हिडिओ शेअर करताना आनंद महिंद्रा म्हणतात; की दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी सर्व्हिस सुरू झाली, तर ती अशीच असेल.

काय आहे व्हिडिओ?

या व्हिडिओमध्ये दिसतंय, की काही जण मिळून एक मोठं कपाट एका जुन्या स्कूटरवर ठेवत आहेत. हे कपाट एवढं मोठं आहे, की त्याला नेण्यासाठी मोठ्या पिकअप किंवा छोट्या टेम्पोची गरज भासेल. मात्र, तरीही हे लोक दुचाकीवर हे कपाट ठेवतात. यानंतर एक महिला अगदी आरामात ही स्कूटर चालवत हे कपाट दुसरीकडे घेऊन जाते.

हे कपाट खाली पडेल की काय असं संपूर्ण व्हिडिओमध्ये वाटत राहतं. मात्र ही महिला एका हाताने कपाट पकडून, दुसऱ्या हाताने स्कूटर चालवत आरामात जात असल्याचं या व्हिडिओत दिसतंय. अगदी दोनच मिनिटांमध्ये ही महिला जिथे कपाट उतरवायचं आहे त्या ठिकाणी पोहोचते आणि हा व्हिडिओ संपतो.

सध्या दहा मिनिटांमध्ये जेवण, भाज्या किंवा ग्रोसरी डिलिव्हरी करणारे कित्येक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. याच पार्श्वभूमीवर जर दहा मिनिटात फर्निचर डिलिव्हरी करणारी सुविधा उपलब्ध झाली, तर ती अशीच असेल असं आनंद महिंद्रांनी मिश्किलपणे म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 5 दिवसांतच 1 लाखाचे झाले 3 लाख! 300% रिटर्न देणाऱ्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल

आरक्षणावरून सुरू झाला वाद अन् कॉलेजमध्ये पेटलं वातावरण! कसा आहे ‘जयंती २’? वाचा Review

Hindi Medium Engineering: इंग्रजीची अडचण दूर! आता चक्क हिंदीतून सिव्हिल इंजिनिअरिंग; विद्यार्थ्यांना मिळणार रु. २ लाखांचे अनुदान

Latest Marathi News Live Update : राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

Ganeshotsav 2026: हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी का? पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? | Ganesh Chaturthi 2026

SCROLL FOR NEXT