Video Viral Sakal
Trending News

नाराज झालेली प्रेयसी चढली हाय व्होल्टेज टॉवरवर, मनवण्यासाठी प्रियकरही चढला अन्... | Video Viral

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर या माध्यमातून जगातल्या विविध घटना आपल्यापर्यंत पोहोचत असतात. यातून आपल्याला वेगवेगळ्या स्वभावाचे लोकं, घटना माहिती होत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये एक तरूण प्रेयसी आपल्या प्रियकरावर नाराज झाल्यानंतर टॉवरवर चढली आहे.

अधिक माहितीनुसार, ही घटना छत्तीसगढ येथील असल्याची माहिती समोर आली आहे. प्रियकरासोबत भांडण झाल्यानंतर ही तरूणी प्रियकरावर नाराज झाली आणि थेट हाय व्होल्टेज टॉवरवरच्या टोकावर चढली. या टॉवरची उंची पाहून आपणही थक्क व्हाल. तर या प्रेयसीला मनवण्यासाठी पुन्हा प्रियकरही टॉवरवर चढला आणि काही काळानंतर ते दोघेही परत आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, हे प्रेमीयुगुल जवळपास अर्ध्या तासांपर्यंत या टॉवरवर होते. त्यानंतर हे दोघेही खाली आल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पोलिसांनी चोकशी सुरू केली आहे. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT