anju Sakal
Trending News

Anju in Pakistan : पाकिस्तानात अंजूला आली भारताची आठवण! 'ये मेरा इंडिया'वर केला डान्स; गालावरही बनवला तिरंगा

तिने 'ये मेरा इंडिया' या गाण्यावर रील बनवलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

आपल्या प्रियकरासाठी भारतातून पाकिस्तानला गेलेल्या अंजूची आणि पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आलेल्या सीमा यांची लव्ह स्टोरी चांगलीच चर्चेत आहे. तर अंजू आणि सीमाने पाकिस्तान आणि भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे. पण पाकिस्तानात गेलेल्या अंजूला भारताची आठवण काही शांत बसू देत नाही. तिने 'ये मेरा इंडिया' या गाण्यावर रील बनवलं आहे.

परंपरागत विरोधक असलेल्या भारत आणि पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन तीन दिवसांपूर्वी पार पडला. यावेळी पाकिस्तानातून भारतात आलेल्या सिमाने भारताचा स्वातंत्र्यदिन चांगल्या उत्साहात साजरा केला. तर भारतातून पाकिस्तानात गेलेल्या अंजूनेही पाकिस्तानबरोबर भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे. पण त्यानंतर तिने 'ये मेरा इंडिया' या गाण्यावर बनवलेला रील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी तिने आपल्या गालावर तिरंगाही काढल्याचं दिसत आहे.

अधिक माहितीनुसार, भिवाडी येथील रहिवाशी असलेली अंजू आपल्या नवऱ्याला आणि मुलांना सोडून पाकिस्तानातील आपल्या प्रियकराकडे गेली आहे. नसरूल्ला असं तिच्या पाकिस्तानी प्रियकराचं नाव असून अंजूने पाकिस्तानात जाऊन इस्लाम धर्म स्विकारला आहे. त्यानंतर त्यांनी लग्न केलं असून त्यांच्या प्री-वेडिंग फोटोशूट, डीनर, डान्सचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

१४ ऑगस्ट रोजी अंजू पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन साजरा करताना दिसली. यावेळी तिने आपला नवीन पती नसरूल्ला याच्यासोबत केकही कापला. त्यानंतर एका मुलाखतीत ती म्हणाली की, "मी भारताची लेक आहे, भारतातच माझा जन्म झाला आहे, मी भारतात जाणार, पाकिस्तान चांगला आहे पण भारतसुद्धा मला आवडतो, भारतसुद्धा चांगला देश आहे" असं अंजू म्हणाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT