Anju Nasrullah Love Story Sakal
Trending News

Anju-Nasrullah Love Story: महागडं फोटोशूट, गिफ्ट म्हणून जमीन, विशेष सुरक्षा व्यवस्था; पाकिस्तानात अंजूची चैन

अंजू आपल्या प्रियकरासाठी आपला पती आणि दोन लहान मुलांना भारतात सोडून पाकिस्तानात निघून गेली आहे. तिथे तिचा जोरदार पाहुणचार होत आहे.

वैष्णवी कारंजकर

भारतातून पाकिस्तानला गेलेल्या अंजू उर्फ फातिमाचं लग्न नसरुल्लाह याच्याशी झालं आहे. यानंतर त्या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अंजूला पाकिस्तानात महागडे गिफ्ट्स मिळत आहेत, प्लॉट दिले जात आहेत.

एवढंच नव्हे, तर अत्याधुनिक कॅमेऱ्यांच्या मदतीने त्यांचे व्हिडीओ शूट करून ते व्हायरल केले जात आहेत. पण नक्की हे सगळं कोण करत आहे? तर या संबंधात पाकिस्तानची यंत्रणा आयएसआयचं नाव समोर येत आहे. भारतात सीमा हैदरला त्रास होत असला तरी अंजू पाकिस्तानात खूप खूश आहे, हे दाखवण्याचा त्यांचा उद्देश असल्याचं वृत्त आजतकने दिलं आहे. पण यामागे पाकिस्तानचा काहीतरी कट असल्याचाही संशय आहे.

अंजूवर पाकिस्तानकडून एवढा कौतुकाचा वर्षाव का?

अंजूवर गिफ्ट्चा अक्षरशः पाऊस पडत आहे. पाकिस्तानचे श्रीमंत बिल्डर्स अंजूला प्लॉट्स भेट देत आहेत. अंजू एका मोठ्या व्यावसायिकाकडून एका प्लॉटची कागदपत्रं घेत आहे, असं एका व्हिडीओमध्ये दिसत आहे. गिफ्ट मिळालेला हा प्लॉट इस्लामाबादजवळ आहे. या जमिनीसोबतच पाक स्टार गृपचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहसिन खान अब्बासी यांनी अंजूला ५० हजारांचा चेकही दिला आहे.

अब्बासी यांच्यानंतर नवाब हाऊसिंगचे तुफैल खान यांनीही अंजूला प्लॉट भेट दिला आहे. हा प्लॉट पेशावरमध्ये आहे. खैबर पख्तुनख्वा मधल्या अपर डीर भागातल्या कुलशू गावामध्ये अंजूचा पाहुणचार सध्या सुरू आहे. तिला वेगवेगळ्या प्रकारचे महागडे गिफ्ट्स दिले जात आहेत. नसरुल्लाहचे नातेवाईक अंजूला गिफ्ट्स देत आहेत. फातिमा बनलेली भारतीय महिला अंजूने नसरुल्लाहसोबत जेव्हा लग्न केलं तेव्हा तिने लग्नात खूप महागडे कपडे परिधान केले होते.

महागडे फोटो आणि व्हिडीओ शूट्स

अंजूचे फोटो काढले जात आहेत, व्हिडीओ शूट्सही केले जात आहेत. हे व्हिडीओ फोटो शूट अगदी प्रोफेशनल पद्धतीने केले जात आहेत. ड्रोनचा वापर करूनही तिचे फोटो आणि व्हिडीओ शूट केले जात आहेत. अंजू कशी खूश आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.

अंजूचा पहिला पती कोण?

भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू आता फातिमा झाली आहे. तिने आपल्या चार वर्षांपासूनच्या बॉयफ्रेंडशी लग्न केलं आहे. अंजूच्या पहिल्या पतीचं नाव अरविंद आहे. तो अलवरमधल्या एका कंपनीमध्ये काम करत आहे. नुकतंच तिचा अरविंदशी बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये अंजूने स्वतःहून अरविंदला फोन लावला होता. पण त्यानंतर तिने आपल्या पतीला शिवीगाळ करायला सुरुवात केली. अंजूचं आता म्हणणं आहे की भारतात परतू इच्छिते, पण तिच्या पतीवर ती नाराज आहे. आता आपण फक्त आपल्या मुलांसाठी भारतात परतू असं ती म्हणते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

B.Ed student suicide attempt: खळबळजनक! विभागप्रमुखाच्या लैंगिक छळाने त्रस्त बी.एडच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल; भर कॉलेजमध्येच स्वतःला घेतलं पेटवून

IND vs ENG 3rd Test: रिषभला जसं बाद केलं तसंच करायला गेले, पण सहावेळा तोंडावर आपटले; इंग्लंडची चूक भारताच्या पथ्यावर Video

Pune News: माेठी बातमी! 'संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा'; पुरंदर-हवेली मतदारसंघात खळबळ

Solapur: राष्ट्रवादीच्या दोन जिल्हाध्यक्षपदाचा तिढा सोमवारी सुटणार?; बळिराम साठे ज्येष्ठ नेते शरद पवारांना भेटणार

Latest Marathi News Updates : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का; माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा

SCROLL FOR NEXT