Ganesh Festival Ambani Return Gift Esakal
Trending News

Antilia Cha Raja: अंबानींच्या गणेशोत्सवाला गेलेल्यांना चकाकणारं रिटर्न गिफ्ट, प्रत्येकाच्या हातात दिसणारी ती वस्तू कोणती?

Ambani Ganesh Festival Return Gift: अनंत अंबानींसोबत सलमान खानची एक झलकही समोर आली, ज्यामध्ये अनंत अंबानी सलमानच्या खांद्यावर हात ठेवून बोलताना दिसत आहेत.

आशुतोष मसगौंडे

अंबानी कुटुंबीयांकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाचे अँटिलियामध्ये भव्य स्वागत करण्यात आले. बाप्पाची विधीवत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गणेश उत्सवात सहभागी होण्यासाठी संपूर्ण बॉलिवूड आले होते. यामध्ये बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानही सहभागी झाला होता.

अनंत अंबानींसोबत सलमान खानची एक झलकही समोर आली, ज्यामध्ये अनंत अंबानी सलमानच्या खांद्यावर हात ठेवून बोलताना दिसत आहेत. यावेळी दोघांमध्ये जबरदस्त बाँडिंग पाहायला मिळाले.

रिटर्न गिफ्ट

अंबानी कुटुंबीयांचा कार्यक्रम असेल आणि रिटर्न गिफ्टची चर्चा नसेल असे कधीच होत नाही. प्रत्येक वेळी प्रमाणे यावेळीही अंबानी यांच्याकडून गणेश उत्सवानिमित्त खास भेटवस्तूंचे आयोजन करण्यात आले होते, त्याची झलक प्रत्येक पाहुण्यांच्या हातात पाहायला मिळाली.

ही भेट खूप खास होती. प्रत्येकाच्या हातात चांदीची हँगिंग बास्केट दिसत होती. बाप्पाचा आशीर्वाद म्हणून पाहुण्यांना अंबानींनी दिलेली ही खास भेट होती.

अंबानी कुटुंबाच्या गणेश उत्सवातही बी-टाऊनच्या अभिनेत्रींचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला. जवळपास प्रत्येकीने पारंपारिक पोशाख केला होता. ज्यामध्ये त्यांचे सौदर्य आणखी खुलले होते.

लाल पोशाख परिधान केलेल्या चार सुंदरींनी लोकांचे अनेकांचे वेधून घेतले. यामध्ये करीना कपूर, सोनम कपूर, भूमी पेडणेकर आणि श्रद्धा कपूर यांचा समावेश होता. चौघींनीही लाल रंगाचे सूट घातले होते, पण त्यांची स्टाइल एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळी होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: एसपींकडून जॉइनिंग लेटर अन् मोठा पगार...; वयाच्या अवघ्या ८ व्या वर्षी मुलीला पोलिसात नोकरी, काय काम करणार?

Crime News: रेल्वेत प्रवाशांची लूट करणारी टोळी गजाआड, २२ लाखांचा माल जप्त

Latest Marathi News Updates : सांगलीच्या विटा शहरात विट्याचा राजा गणेशमूर्ती बनलीय गणेश भक्तांचे आकर्षण

Numerology Horoscope : 1 ते 9 मूलांकाच्या जातकांच्या आयुष्यात सप्टेंबर महिन्यात घडणार 'हे' बदल; वाचा मासिक राशिभविष्य

Asia Cup 2025: रिंकू सिंगला भारताच्या प्लेइंग-११ मध्ये संधी मिळणार नाही; वाचा असं कोण म्हणतंय

SCROLL FOR NEXT