anup soni share mumbai police viral video after delhi policeman stops mans street performance rak94 
Trending News

Viral Video : अरे कुठं दिल्ली अन् कुठं मुंबई; अरिजितच्या केसरिया रंगात रंगले मुंबई पोलिस

सकाळ डिजिटल टीम

पोलिसांकडून नागरिकांना वाईट वागणूक दिल्याच्या अनेक घटना आपल्याला माहिती असतात. दिल्लीत रस्त्यावर गिटार वाजवत गाणे गात असलेल्या एका कलाकाराला पोलिस हकलवून देत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर लोक पोलिसांवर झोडून टीका करत आहेत. यादरम्यान मुंबई पोलिसांचा एक सुखावणारा व्हिडीओ देखील शेअर केला जात आहे.

दिल्लीतील कॅनॉट प्लेस या ठिकाणचा हा व्हिडिओ असून या व्हायरल क्लिपमध्ये एक पोलीस कर्मचारी गर्दीने वेढलेल्या गिटार वादकाला हात धरून उचलत असल्याचं दिसतं आहे. वेब सीरिज 'मिर्झापूर' फेम राजेश तैलंगने ट्विटरवर दिल्ली पोलिसांचा हा अमानवी चेहरा उघड करणारा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्याने लिहिले की, 'ही क्लिप इंस्टाग्रामवर पाहिली. दिल्ली पोलिसांची ही कृती योग्य नाही. हे कलाकार आपली दिल्ली आणखी सुंदर आणि संगीतमय बनवतात. यासोबतच त्यांनी शेम असंही लिहीलंय.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की कलाकार गिटार वाजवत आहे. आजूबाजूला त्याचे गाणे ऐकणाऱ्यांची गर्दी दिसत आहे. तेवढ्यात एक पोलीस येतो आणि गिटारवादकाला जबरदस्तीने उचलू लागतो.

राजेश तैलंग यांच्या ट्विटला रिप्लाय देत बॉलिवुड दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. हे योग्य नसून जग आता राजवाड्यात राहणाऱ्यांचे उरलंय. जे लोक रस्त्यावर चालताना आणि त्यांचा प्रवास सुसह्य आणि आनंददायक बनवणाऱ्या गायकांना ऐकतात त्यांचं नाही, असं ट्विट केलं आहे. त्यांच्या या ट्विटला रिप्लाय देत अभिनेते अनूप सोनी यांनी मुंबई पोलिसांचा हा सुखावणार व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये मुंबई पोलिस एका गायकाचं गाणं मन लावून ऐकताना दिसत आहेत. तसेच मुंबई पोलासांनी हा व्हिडीओ सोशल मीडिया स्टोरीमध्ये शेअर केल्याचे देखील दिसून येत आहे. या व्हिडीओतून मुंबई पोलिसांचा मानवी चेहरा दिसून येतोय. या व्हिडीओवर देखील लोक प्रतिक्रिया देत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मराठी विजय मेळाव्यासाठी नवी मुंबईतून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींनो बँक बॅलेन्स चेक करा... किती येणार 1500 की 3000? जून महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

"अरे एडिटिंग तरी धड करा" सारंगच्या कावड वारीचा प्रोमो बघून प्रेक्षकांनी दाखवली चूक ; म्हणाले..

PM Modi Leaf Plate: मोदींनी परदेश दौऱ्यात 'या' खास पानावर केले जेवण, जाणून घ्या 'या' पानावर जेवणाचे काय आहेत फायदे

SCROLL FOR NEXT