Anushka Sharma Sakal
Trending News

हेल्मेट घालून पाणी पिण्याची विराटची स्टाईल मारायला गेली अनुष्का पण... | Anushka Sharma

मैदानावर उपस्थित असलेल्यांना हसू आवरलं नाही.

सकाळ डिजिटल टीम

क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ती हेल्मेट घालून पाणी पिण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण हेल्मेट घातल्यामुळे तिला पाणी पिता येत नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, विराट कोहलीची पत्नी मैदानावर क्रिकेच खेळत आहे. खेळत असताना तिला तहान लागते आणि एकजण तिला पाण्याची बाटली आणून देतो. पण ती हेल्मेट न काढताच पाणी पिऊ लागते. तिला पाणी पिता येत नाही. त्यानंतर ती विचारते, "हेल्मेट न काढता पाणी कसं प्यायचं, मी असं पाहिलं आहे" त्यानंतर मैदानावर उपस्थित असलेल्यांना हसू आवरलं नाही.

सामना सुरू असताना विराट कोहली हेल्मेट डोक्याला असतानाही पाणी पिताना आपण अनेकदा पाहिलं असेल. पण त्याची कॉपी करणं अनुष्काला जमलं नाही म्हणून चांगलाच हशा पिकला. अनुष्काच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगलच शेअर केलं असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. इंस्टाग्रामवर या व्हिडिओला १ लाखांपेक्षा अधिक जणांनी लाईक केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Case: लोहगडावर पुन्हा मर्डर सीन, केतनचा पुतळा पुन्हा तेथूनच फेकला

Pune Breaking News: पुण्यात झाड कोसळलं, मुलगी बचावली,घटना CCTVमध्ये कैद

State Award: अंबडच्या लालवाडीतील प्रगतशील शेतकरी गोवर्धन उगले यांना राज्यस्तरीय कृषीभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार

चंद्रपूरमध्ये वनक्षेत्राबाहेर आढळला वाघाचा मृतदेह; शिकार की नैसर्गिक मृत्यू? गूढ वाढलं...परिसरात खळबळ

Rajapur Tourism: जिथे शिवरायांनी इंग्रजांना धडा शिकवला... राजापूरची ऐतिहासिक ब्रिटिशकालीन वखार नव्या रूपात सज्ज; पर्यटनाचे नवे आकर्षण

SCROLL FOR NEXT