Anant Radhika wedding  
Trending News

Anant Radhika Wedding: अनंत राधिकाच्या लग्नात पाहुण्यांनी चाखलं शेतकरी पुत्राच्या हातचं जेवण

अनंत आणि राधिकाच्या लग्नसोहळ्यात देशविदेशातील मिळून तब्बल असे 2500 शाकाहारी पदार्थ पाहुण्यांसाठी तयार करण्यात आले होते.

सकाळ डिजिटल टीम

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा 12 जुलै रोजी पार पडला. या ग्रँड लग्नाची चर्चा जगभर रंगल्याचे पाहायला मिळालं. अनंत राधिकाच्या विवाह सोहळ्यात देश-विदेशातील अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित होत्या. या पाहुण्यांच्या जेवणासाठी विविध खाद्यपदार्थांची रेलचेल होती. यामध्ये मराठमोळ्या पदार्थांचाही समावेश होता. पण तुम्हाला माहितीय का हे जेवण कोणी बनवलं होतं. चला तर मग जाणून घेऊया.

अनंत आणि राधिकाच्या लग्नात देश-विदेशातील खास डिशेज ठेवण्यात आले होते. लग्नसोहळ्यात देशविदेशातील मिळून तब्बल असे 2500 शाकाहारी पदार्थ पाहुण्यांसाठी तयार करण्यात आले होते. या लग्नसोहळ्यात वेगवेगळ्या राज्यांचे स्टॉल लावण्यात आले होते. तसेच, या ग्रँड सोहळ्यात पाहुण्यांनी देशी काठीयावाडी पदार्थाचा देखील अस्वाद घेतला.

तर ही देशी काठीयावाडी ही डिश शेतकरी पुत्र निकुंज वसोया ने बनवली होती. निकुंज वसोया हे अंबानींच्या मुळ गावचे आहेत. वसोया हे जामनगर येथील खिजडीया गावातील आहेत. वयाच्या 15 व्या वर्षी त्यांनी स्वादिष्ट जेवण बनवण्यास सुरुवात केली.

फार्म किचन ते अंबानी वेडिंग शेफ पर्यंत

कुकिंग चॅनेल काढण्याच त्यांचं लहानपणीचं स्वप्न होतं. जे 2013 मध्ये पुर्ण झालं. आपली आवड जपण्यासाठी त्याने cs चे शिक्षण सोडलं आणि गावातूनच यु- ट्यूब चॅनेल सुरु केलं. या चॅनेलद्वारे तो गावाकडच्याच देशी रेसिपी नेटिझन्सपर्यंत पोहचवत राहिला.

सुरुवातीला त्याला कोणताही फायदा झाला नाही पण न डगमगता त्याने आपल्या पॅशनवर भर दिला आणि त्याची देसी स्टाईल सर्वांच्या पसंतीस पडू लागली. त्यानंतर तो यशाचा पायऱ्या चढू लागला. आता निकुंज चार फुड चॅनेल चावत आहे.

काही दिवसांपूर्वी निकुंजने एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी, मी गरीब कुटुंबातील आहे, मला लहानपणापासूनच समजले होते की माणूस श्रीमंत असो किंवा गरीब, चांगले अन्न कोणालाही आनंदी करू शकते." अशी भावना त्यानं यावेळी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT