Viral Video Sakal
Trending News

Viral Video : ट्रेनच्या AC डब्यात 'बुलेट ट्रेन'च्या वेगाने पाण्याची धार; प्रवाशांचा चिंब भिजत प्रवास

हा व्हिडिओ पाहून तुम्हाला भारतीय रेल्वेची अवस्था लक्षात येईल.

सकाळ डिजिटल टीम

ट्रेनचं छत लीक होऊन अनेकदा ट्रेनमध्ये पाणी आल्याच्या घटना आपण पाहिल्या असतील. पण वंदे भारत ट्रेनसारख्या अत्याधुनीक ट्रेनमध्येसुद्धा पावसाचे पाणी घुसल्याचं ऐकून तुम्हाला धक्का बसेल. सध्या अवंतिका एक्सप्रेसमधील २ टीअर एसी कोचमध्ये छतातून पाणी गळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे पाहून तुम्हाला भारतीय रेल्वेची अवस्था लक्षात येईल.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ अवंतिका एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने शेअर केला आहे. "या पावसामध्ये एसी बोगीची अवस्था अशी झाली आहे. रेल्वेच्या छतावरून पाणी गळत असल्याने प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे." अशी तक्रार या प्रवाशाने केली आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान, या आधी वंदे भारत ट्रेनमधील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्येही एका डब्यात अशा प्रकारे पाणी गळत होते. तर या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विनोदी कमेंट केल्या आहेत. तर अनेकांनी या प्रकरणावरून सरकारला धारेवर धरलं आहे. हे प्रकार पाहून आपणही पावसाळ्याच्या काळात रेल्वेने प्रवास करताना विचार कराल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT