Emotional Video Sakal
Trending News

Video : देवाला माझा हात हवा होता, मी दिला; अपघातात हात गमावल्यानंतर लेकराचं बोलणं ऐकून आई ढसाढसा रडली

हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही रडू आवरता येणार नाही.

दत्ता लवांडे

लेकरं निरागस असतात. ती देवाघरची फुलं असतात ते उगीच नाही. त्यांच्या मनात कोणतंच पाप नसतं. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सदर चिमुकल्याने एका अपघातात आपला हात गमावल्यानंतर एका पत्रकाराला भावनिक उत्तर दिलं आहे. "देवाला माझा हात हवा होता म्हणून मी दिला" असं चिमुकल्याचं उत्तर ऐकून आपल्यालाही रडू आवरणार नाही.

हा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका अपघातात चिमुकल्याने आपला हात गमावला. नंतर एका पत्रकाराने त्याला यासंदर्भात विचारले असता तो म्हणाला की, "देवाला माझा हात पाहिजे होता. त्यामुळे मी माझा हात दिला, आता मला वेदना होत नाहीत, आता माझी आई तिच्या हाताने मला जेवन भरवते" असं भावनिक उत्तर या चिमुकल्याने दिल्यानंतर त्याची आई हुंदके देत रडू लागली आहे.

चिमुकल्याची आई म्हणते की, "आम्ही दोन तास मुलाचा हात काढण्याचा प्रयत्न करत होतो पण त्याचा हात बाहेर निघाला नाही. नंतर डॉक्टर म्हणाले की, मुलाचा हात कट करावा लागेल" असं म्हणत चिमुकल्याच्या आईला आपलं रडू आवरता आलं नाही. ती हुंदके देत रडताना दिसत आहे. सध्या हा भावनिक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune RTO: ''पुण्याची ओळख कायम राहणार'', 'MH 12'साठी मुरलीधर मोहोळ नितीन गडकरींच्या भेटीला; म्हणाले...

Cyber Fraud : निर्मला सीतारामन यांच्या डीपफेक व्हिडिओचा गैरवापर; पुण्यातील व्यावसायिकाची तब्बल एक कोटी सात लाखांची ऑनलाइन फसवणूक

Kolhapur Blast: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा स्फोट; नागरिकांमध्ये भीती, पोलिस घटनास्थळी दाखल

Pradeep Rawat: 'गजनी' फेम अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन; 74 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Solapur Pune Highway Incident: शिवशाही बसचे ब्रेक फेल; चालकाच्या प्रसंगावधानाने सोलापूर-पुणे महामार्गावरील मोठा अनर्थ टळला, १४ प्रवासी सुखरूप

SCROLL FOR NEXT