Badtameez Women in War of Words Over Seat Issue in Delhi Metro see viral video  Esakal
Trending News

Viral Video: 'मेट्रो तुझ्या बापाची आहे का?' दिल्ली मेट्रोतील प्रवासी मुलींमध्ये पुन्हा बाचाबाची, Video Viral

Viral Video: पुन्हा एकदा दिल्ली मेट्रोमधील भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावेळी दोन मुलींमध्ये भांडण झाले त्या दोघींनी एकमेकीांना खूप शिवीगाळ केल्याचेही या व्हिडीओत दिसून येते.

अंकिता खाणे (Ankita Khane)

डीएमआरसीने दीर्घकाळ इशारे देऊनही दिल्ली मेट्रोमध्ये नाचणे, गाणे, मारामारी आणि कोलाहल थांबत नसल्याचे चित्र आहे. नुकतेच असे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत ज्यात कोणी मेट्रोमध्ये अश्लील कृत्य करताना दिसत आहे तर कोणी रील्स बनवण्यासाठी मूर्खपणाचे काम करत आहे. याशिवाय काही वेळा जागांवरून भांडणेही होतात. कायमच चर्चेत असलेली दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी मेट्रोमध्ये दोन मुलींमध्ये वाद झाल्याचे प्रकरण आणि त्याचा व्हिडीओ समोर आले आहे.

एकमेकांच्या समोरच्या सीटवर वाद घालत असताना पहिली मुलगी म्हणते – तिने कधी दिल्ली मेट्रो पाहिली नाही आणि मेट्रो पहिल्यांदा बघून ती वेडी झाली आहे. यावर दुसरी उत्तर देते- मी 10 वर्षांपासून इथे राहतेय, मेट्रो तुझ्या बापाची आहे का?

दरम्यान, मेट्रोमध्ये बसलेली दुसरी महिला पहिल्या मुलीला समजावते- तिला जाऊ देत, तिला एक लहान मूल आहे. मग त्यावर पहिली मुलगी म्हणते - मला सांग, ती तिच्या मुलाला काय शिकवेल? त्यावर दुसरी मुलगी म्हणते, तेच जे तुझ्या बापाने तुला शिकवले.

मेट्रोमधील या संपूर्ण भांडमाचा व्हिडीओ कोणातरी @gharkekalesh या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ लगेच व्हायरल झाला आणि लोकांनी त्यावर कमेंट करायला सुरुवात केली. अनेक जण म्हणाले- मेट्रोमध्ये हा रोजचा तमाशा झाला आहे. दुसऱ्याने लिहिले - भाऊ, दिल्ली मेट्रो भांडणाचा आखाडा बनली आहे.

दिल्ली मेट्रोमध्ये भांडणाची ही पहिलीच घटना नसून यापूर्वीही असे प्रकार अनेकदा घडले आहेत. गेल्या महिन्यात व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, दोन महिलांमध्ये, एका जागेवरून वाद झाला होता. हा वाद इतका वाढला की, या वादात एकाने दुसऱ्या मुलीला धक्काबुक्की केली आणि प्रत्युत्तरात दुसरीने तिचा पाय अडवून तिला पडण्याचा प्रयत्न केला व्हिडीओमध्ये दिसते की, शेजारी उभा असलेला जमाव त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत नाही, उलट प्रत्येकजण त्यांचा व्हिडिओ बनवतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kunbi Reservation: ओबीसी बचाव आंदोलनाची धार बोथट! पाच नेत्यांच्या पाच भूमिका; काही पक्षात अडकले, काहींना इगो प्रॉब्लेम?

Shocking : भारत-पाकिस्तान सामना पाहण्यात चाहत्यांना रस राहिला नाही? तिकीट विकल्याच जात नाही, कारण काय तर...

Nepal Protests: भारतात लष्करी शिक्षण घेणारा व्यक्ती होणार नेपाळचा सर्वेसर्वा, Gen Z च्या तांडवानंतर मोठी जबाबदारी

Latest Marathi News Updates : स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी सुनावणी पार

Adani: साडेसात हजार कोटी द्या! अदाणींची ‘परिवहन’कडे मागणी, राज्य शासनाचे ५०० कोटी बुडणार; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT