Viral Video Sakal
Trending News

Video Viral : बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात लहान मुलीला आईसमोर उचलून बाहेर फेकलं

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे.

दत्ता लवांडे

बागेश्वर धामचे पंडित धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका लहान मुलीला चालू कार्यक्रमात सुरक्षा रक्षकाकडून उचलून बॅरिकेट्सच्या बाहेर टाकण्यात आलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ बागेश्वर धाम यांच्या कार्यक्रमातील आहे. त्यांच्या कार्यक्रमात अनेक महिला आणि पुरूष येऊन आपली समस्या मांडत असतात. तर बागेश्वर बाबा आणि कार्यक्रमासाठी आलेल्या भक्तांच्या मध्ये बॅरिकेट्स लावले आहेत. तर तेथील स्वयंसेवक असलेल्या सुरक्षारक्षाकाने या बॅरिकेट्सवरून मुलीला उचलून पलीकडे टाकलं आहे.

यावेळी तिथे पोलिसही उपस्थित असल्याचं दिसत असून सदर मुलीच्या आईसमोर हा प्रकार घडला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जात असून या बाबांवर कारवाई करण्याची मागणी नेटकऱ्यांकडून केली जात आहे. दरम्यान, याप्रकरणी तक्रार न करण्यासाठी बागेश्वर मठ प्रशासनाकडून सदर तरूणीच्या कुटुंबियांवर दबाव आणला जात असल्याचा दावा या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये करण्यात आला आहे.

हा व्हिडिओ abhishek_as_it_is या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. कुणालाही या परिवारासंबंधी माहिती असेल तर मला कळवा मी त्यांची मदत करेल असं अवाहन करण्यात आलं आहे. तर हा व्हिडिओ नेटकऱ्यांनी शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT