Sheikh Hasina House Video 
Trending News

Sheikh Hasina House : कोणी बेडवर झोपला तर काहींचा जेवणावर ताव! शेख हसीनांच्या घरात घुसून लोकांचा धुडगूस; समोर आला Video

Bangladesh Prime Minister Hasina steps down and leaves country : बांगलादेशच्या पंतप्रधआन शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर तेथे अंतरिम सरकार स्थापन केले जाणार आहे.

रोहित कणसे

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर तेथे अंतरिम सरकार स्थापन केले जाणार आहे. दरम्यान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देशातून पळ काढल्यानंतर देशातील परिस्थिती बिकट बनली आहे. आंदोलनकर्ते ढाका येथील पंतप्रधान निवासात शिरल्याचा प्रकार समोर आला.

यासंबंधीचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. यामध्ये आंदोलनकर्ते हे लूटपाट आणि तोडफोड करताना दिसत आहेत. इतकेच नाही तर काही जण पंतप्रधान निवासामधील सामान उचलून घेऊन जाताना दिसत आहेत.

सोमवारी दुपारी बांगलादेशातील आंदोलन जास्तच तीव्र झालं, यावेळी हजारोंच्या संख्यने जमाव शेख हसीना यांच्या सरकारी निवासस्थानाजवळ गोळा झाला. यावेळी लोकांनी शेख मुजीबुर रहमान यांचा पुतळा देखील पाडला. हसीना यांच्या निवासस्थानात घुसलेल्या लोकांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. जे शेख हसीना भारताकडे निघाल्यानंतर लगेचचे आहेत.

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एकजण हसीना यांच्या निवासस्थानातील अंथरूणावर झोपलेला दिसत आङे. इतर जण तेथील सामानाची तोडफोड करताना दिसत आहेत, दुसऱअया एका व्हिडीओमध्ये आंदोलनकर्ते शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्यावर चढून तो फोडताना दिसत आहेत. काही व्हिडीओमध्ये लोक पंतप्रधान निवासामधील भांडी, कार्पेट इतकेच नाही तर शिडी देखील चोरताना दिसले.

मागील काही दिवसापासून बांगलादेशमध्ये सरकारविरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान १०० हून जास्त जणांचा मृत्यू देखील झाला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर हे आंदोलन पेटलं होतं.

पुढं काय होणार?

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता अंतरिम सरकार कार्यभार सांभाळणार आहे. बांग्लादेशच्या लष्करप्रमुखांनी याबद्दलची घोषणा केली होती. सध्या शेख हसीना या भारतात दाखल झाल्या आहेत. मात्र येत्या काळात त्या दिल्लीहून लंडनला रवाना होऊ शकतात असे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghati Medical College: ‘घाटी’तील ३५७ पदांसाठी अकरा शहरांत आजपासून परीक्षा; ‘टीसीएस’तर्फे २७ केंद्रांवर तीन सत्रांमध्ये नियोजन

Accident News : भरधाव कंटेनरची भाविकांच्या ट्रॅक्टरला धडक, ८ जणांचा जागीच मत्यू, ४३ जखमी

भारतीय संघाला स्पॉन्सर करू शकणार नाही, Dream11ने मोडला BCCIसोबतचा करार; आशिया कपसाठी जर्सीवर कोणाचं नाव?

Nanded Mumbai Vande Bharat Express: नांदेड मुंबई ‘वंदे भारत’ मंगळवारपासून धावणार

ISRO Successfully Tests: इस्रोची गगनयान मोहिमेसाठी यशस्वी इंटिग्रेटेड एअरड्रॉप चाचणी, चिनूक हेलिकॉप्टरने पाच टनाची कुपी सोडली

SCROLL FOR NEXT