Viral Video Sakal
Trending News

Viral Video : बँकेत आधार लिंक करायला उशीर, महिलेच्या अंगात आली देवी; सरकारला दिला शाप

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

माझ्या अंगात देव येतो असा दावा अनेकजण करत असतात. देव अंगात आल्यावर महिला किंवा पुरूष मोठा आवाज करत उड्या मारत असतात. एखाद्या यात्रेत किंवा अध्यात्मिक कार्यक्रमामध्ये असे प्रकार होत असतात. पण सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये महिलेला बँकेतच अंगात देवी अल्याचं सांगण्यात येत आहे.

सदर महिला बँकेत गेली असताना आधार लिंक न झाल्यामुळे लाडली बहना योजनेसाठी उशीर झाला. त्यामुळे या महिलेने बँकेतच राडा केला. तिच्या अंगात देवी आली अन् तिने मोठा गोंधळ करत आरडाओरड केली. यावेळी तिने सरकारला शाप सुद्धा दिला. पण काही वेळात ती शांत झाली आणि तेथीलच खुर्चीवर बसली.

दरम्यान, मध्यप्रदेश सरकारने लाडली बहना योजना राबवली आहे. त्या माध्यमातून शिवराज सिंह चौहान सरकार महिलांना आर्थिक सहायता करणार आहे. तर मुख्यमंत्री चौहान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ते म्हणतात की, "माझा संकल्प आहे की, माझ्या बहिणींच्या डोळ्यात अश्रू नाही तर चेहऱ्यावर हसू असेल" त्यांच्या या व्हिडिओला रिप्लाय करताना हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

मध्यप्रदेश युथ काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. तर यामध्ये लाडली बहना योजनेसाठी आधार लिंक करण्यासाठी अडचणी येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, MI vs RCB : बंगळुरूने मारलं वानखेडेचं मैदान, मिळवला तिसरा विजय; मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्रिक

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं काय चुकतंय? RCB विरूद्धच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने स्पष्टच सांगितलं

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

SCROLL FOR NEXT