Viral Video Sakal
Trending News

Video Viral : मित्रांचा नाद खुळा! जीमला न आलेल्या मित्राच्या घरी नेलं थेट ढोलताशा पथक

मित्र घराच्या बाहेर येईपर्यंत त्याच्या दारात ढोलताशा वाजवत सगळे मित्र बसले ठाण मांडून

सकाळ डिजिटल टीम

बीड : मित्र हा दुसऱ्या मित्रासाठी काय काय करू शकतो याचा कधी नेम नसतो. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा म्हणतात ते काय खोटं नाही. संकटकाळी अनेक मित्रच कामाला येत असतात. पण एखाद्या मित्राची चेष्ठा करायची असेल किंवा अद्दल घडवायची असेल तरीही मित्रमंडळीच आघाडीवर असतात. सध्या याचीच प्रचिती आली असून बीडमधील मित्रांच्या ग्रुपचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आपला आळशी मित्र जीमला येत नाही म्हणून इतर मित्रमंडळींनी थेट त्याच्या दारात ढोलताशा पथकच नेलं आहे. वाचून आपल्याला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. सदर मित्राच्या दारात ढोलताशा पथक वादन करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

सदर मित्र जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत ढोल ताशा वाजत राहिला आणि जवळपास दहा बारा मित्र त्याच्या घरासमोर ठाण मांडून बसल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

हा व्हिडिओ बीड शहरातील असून संदीप लवांडे यांनी हा व्हिडिओ फेसबुकवरून शेअर केला आहे. "सकाळी ग्राऊंडला खाडे करणारे मित्र, बीड पंचायत समितीचे सभापती बळीराम गवते पाटिल यांच्या दारात बँडबाजा घेऊन पोहचलेला रंकाळा ग्रुप." असं कॅप्शन त्यांनी या व्हिडिओवर केलं असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

दरम्यान, "असे मित्र असल्यावर माणूस शंभर वर्षे का नाही जगणार? कशाला येईल अटॅक, सकाळी सकाळी दिल जित लिया रे तात्या" अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या असून खरोखर हा व्हिडिओ पाहून आपल्यालाही आपल्या जिगरी मित्रांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aadhar Card : 'यासाठी' आधार कार्ड बाद, लाखो प्रमाणपत्र होणार रद्द, पोलीस तक्रारीचाही इशारा! राज्य सरकारचा नवा GR काय?

सर्फराज खान, अभिमन्य ईश्वरन यांच्यासाठी कसोटी संघाचे दार कायमचे बंद? गौतम, गिलचा त्यांच्यावर विश्वास नाही?

Sangamner Politics: कोणताही माईचा लाल लाडकी बहीण योजना बंद करू शकत नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; संगमनेरमधील सभेत काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; प्रचाराची मुदत 1 डिसेंबर रात्री 10 वाजेपर्यंत वाढवली

भारतीय कसोटी संघात Ruturaj Gaikwadला मोठी जबाबदारी; गटांगळ्या खाणारा संघ मजबूत होणार, जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT