Patna Criminal Shot Dead CCTV Footage Viral esakal
Trending News

Patna hospital firing Video: अगदी 'फिल्मी'स्टाइलने ते पाचजण बंदूक घेवून रूग्णालयात शिरले, अन् काही क्षणातच..!

Shocking Firing Inside Patna Hospital : या खळबळजनक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Mayur Ratnaparkhe

Patna Criminal Shot Dead CCTV Footage Viral: बिहारमध्ये आगमी  काळात विधानसभा निवडणूक होणार आहे. तर सध्या राज्यात दररोज नवनवीन गुन्हेगारी घटना घडत आहेत. यामुळे सर्वसामान्यांचा जीवही टांगणीला असल्याचे दिसते. तर, विरोधीपक्ष नेते यावरून सरकारला धारेवर धरत आहेत.

 दरम्यान, पाटण्यामध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. आज पाटण्यातील पारस रुग्णालयात एका कैद्याची भरदिवसा हत्या करण्यात आली. या थरारक घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये गोळीबार करणाऱ्यांनी त्या कैद्याला कसे मारले हे दिसून येते. तर हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

ही संपूर्ण घटना पारस रुग्णालयात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ज्यामध्ये  गोळीबार करणारे एकत्रितपणे त्या रुग्णालयाच्या खोली क्रमांक २०९ मध्ये कसे शिरतात हे दिसून येते. त्या व्हिडिओमध्ये असे दिसते की प्रत्येकाकडे एक पिस्तूल होती जी ते खोलीत प्रवेश करण्यापूर्वी बाहेर काढतात आणि मग सर्वजण एक-एक करून त्या खोलीत प्रवेश करून कैद्यावर गोळ्या झाडतात. अवघ्या काही क्षणात हा संपूर्ण गेम होतो अन् हल्लेखोर पुन्हा तिथून सहीसलामत बाहेरही निघून जातात. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

आरोपी गोळीबार करून परत पळून जात असतानाच, बाजूच्या खोलीमधील एक दोन जण डोकावून पाहतानाही दिसतात. मात्र त्यांना नेमकं काय घडलं याचा अंदाजही कदाचित आलेला नसतो. तर हल्लाकरण्याआधी जो एक जण सर्वातआधी कैद्याच्या रूमध्ये बंदूक घेवून शिरलेला असतो, तोच सर्वात शेवटी त्या खोलीतून बाहेर पडतो आणि अगदी शांतपणे तिथून जाताना दिसतो.

 चंदन मिश्रा नावाच्या एका आरोपीला पारस रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते. चंदन मिश्रा हा मूळचा बक्सरचा रहिवासी आहे आणि तो तेथील केसरी हत्याकांडातील आरोपी होता. तो सध्या बेऊर तुरुंगात होता आणि त्याला उपचारासाठी पॅरोलवर पारस रुग्णालयात आणण्यात आले होते, जिथे पाच शूटरनी त्याची हत्या केली.  या घटनेनंतर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल, थोड्याच वेळात विसर्जन, अनंत अंबानीही उपस्थित

मुंबईत गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी

Village Road Dispute : पाणंद रस्त्यावरून होणाऱ्या वादावर प्रशासनाचे महत्वाचे पाऊल, रस्त्यांचे 'बारसं' घालून अतिक्रमण निघणार

Latur Crime: उदगीरमध्ये अनैतिक संबंधातून ४५ वर्षीय तरुणाचा खून; दोन आरोपींवर गुन्हा दाखल

Ganesh Visarjan 2025 : लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप ! दुसऱ्या दिवशीही राज्यासह देशभरात विसर्जन मिरवणुकांचा उत्साह

SCROLL FOR NEXT