exam esakal
Trending News

Exam Hall Height: परीक्षा हॉलची उंची अधिक असल्यास परीक्षेत कमी गुण मिळतात! अभ्यासातील निष्कर्ष

पण एका अभ्यासातून समोर आलेला हा निष्कर्ष विचित्र वाटेल असा आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : तुम्ही परीक्षेचा पेपर चांगला जावा यासाठी अनेक गोष्टी केल्या असतील. यामध्ये नोट्स बनवल्या असतील, चांगला अभ्यास केला असेल, चांगली झोप घेतली असेल आणि परीक्षेपूर्वी तीन वेळा विषयांची रिव्हिजनही केली असेल. पण तरीही, तुम्हाला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळवलेत का? तुमच्या या प्रयत्नांव्यतिरिक्त एक गोष्ट तुमचे गुण कमी होण्यास कारणभूत असू शकते.

पण ही गोष्ट ऐकून तुम्हाला काहीसं विचित्र वाटेल. पण एका अभ्यासातून हा निष्कर्ष समोर आला आहे की, जर परीक्षा हॉलची उंची अधिक असेल तर विद्यार्थ्यांना परीक्षेत कमी मार्क्स मिळतात. (Bizarre new study reveals students score low in exams if exam room ceilings are too high)

युनिव्हर्सिटी ऑफ साउथ ऑस्ट्रेलिया आणि डेकिन युनिव्हर्सिटीनं केलेल्या एका नवीन अभ्यासातून शैक्षणिक कामगिरी आणि आर्किटेक्चर यांच्यातील विचित्र संबंध उलगडला गेला आहे. एखाद्या जागेच्या डिझाईनचा तुमच्या कामगिरीवर कसा परिणाम होऊ शकतो हे अभ्यासातून दिसून आलं आहे. विद्यार्थी जेव्हा परीक्षेत तुलनेने खराब कामगिरी करतात त्याचं कारण म्हणजे त्यांची परीक्षा ज्या खोलीत पार पडलेली असते त्याचं छत अधिक उंच असतं.

पंधरा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांवर अभ्यास

या अभ्यासातील संशोधकांनी 15,400 पेक्षा जास्त अंडरग्रेजुएट विद्यार्थ्यांचे आठ वर्षांत विविध विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये मूल्यांकन केलं. याच्या विश्लेषणासाठी त्यांनी या विद्यार्थ्यांची पूर्वीची शैक्षणिक कामगिरी आणि सामाजिक, आर्थिक स्थिती, वय, लिंग आणि परीक्षेचे वर्षे यामधील फरक विचारात घेतला. या अभ्यासात वापरण्यात आलेल्या टेक्निकनुसार, व्हर्च्युअल रिॲलिटी चाचणीनं (VR) या निष्कर्षांना पुष्टी दिली आहे.

यात म्हटलं की, ज्यावेळी विद्यार्थ्याशी वेगवेगळ्या खोल्यांमध्ये संपर्क केला गेला तेव्हा आवाज आणि तापमान यांसारखे पर्यावरणीय घटक स्थिर ठेवण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांमधील चिंतेची पातळी समजून घेण्यासाठी त्यांच्या हृदयाची गती, श्वासोच्छवास आणि घाम येण्याचे उपाय नोंदवले गेले. या VR प्रयोगांतील निरीक्षणानुसार मोठ्या खोलीत विद्यार्थी परीक्षेसाठी बसल्यास त्याना पेपरच्या लिखाणावर लक्ष केंद्रित करणं अवघड जातं. हे निष्कर्ष संशोधकांनी वास्तविक जीवनातील परिस्थितींमध्ये लागू करुन पाहिले आणि आश्चर्य म्हणजे त्याचा परिणाम संबंधित विद्यार्थ्याला परीक्षेत कमी गुण मिळण्यात झालं.

ऑस्ट्रेलिया, भारतात होतात हॉलमध्ये परीक्षा

असं होण्यामागचं कारण म्हणजे मोठ्या जागा त्यांच्या डिझाइनमध्ये मोकळेपणा भासवतात. अशा खोल्या या मोठ्या मेळाव्यांसाठी बनवल्या जातात. त्यामुळं त्या प्रदर्शन, कार्यक्रम, थिएटर आणि व्यायामशाळा यांसारख्या गोष्टींसाठी सर्वात योग्य आहेत. परंतू असं डिझाईन हे कार्यक्षमतेवर परिणाम करतं, लक्ष केंद्रित करणं आणि कार्य कार्यक्षमतेत अडथळा आणतं. बऱ्याचदा ऑस्ट्रेलिया, भारत आणि इतर अनेक देशांमध्ये, वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी विद्यापीठ आणि शालेय परीक्षा मोठ्या हॉलमध्ये घेतल्या जातात.

चिंता-तणाव-भीतीचं वातावरण

आणखी एक बाब म्हणजे खोलीचा मोठा आकार हा चिंता, तणाव आणि एक भीतीचं वातावरण तयार करत असतं. दुसरं म्हणजे, मोठ्या इनडोअर मोकळ्या जागा बंद असतात, यामध्ये मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थी सामावून घेतात. यामुळं हवेचा खऱाब प्रवाह, शारीरिक आणि मानसिक आरोग्यास त्रासदायक ठरतं. त्यामुळं संशोधकांनी या जागांचं पुनर्मूल्यांकन करण्याची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक कामगिरीत कोणत्याही पर्यावरणीय अडचणींशिवाय त्यांची सर्वोत्तम कामगिरी निश्चित करण्यासाठी परीक्षा हॉलमध्ये बदल करणं आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT