Viral Sakal
Trending News

केंद्रीय मंत्र्याची बॅटिंग, बॉल थेट भाजप नेत्याच्या डोक्यात; गाठला दवाखाना, Video होतोय Viral

या अपघातात भाजप नेत्याच्या डोक्याला जखम झाली असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

एखाद्या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनावेळी नेत्याने किंवा पुढाऱ्याने मारलेला बॉल कार्यकर्त्याच्या डोक्याल लागल्याची घटना क्वचितच घडतात. तर भाजपचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मारलेला बॉल थेट भाजपच्या एका नेत्याच्या डोक्यात लागला आहे. या अपघातात भाजप नेत्याच्या डोक्याला जखम झाली असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियार चांगलाच व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी यावर आपल्या मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ही घटना मध्यप्रदेश येथे घडली असून सिंधिया हे एका क्रिकेटच्या मैदानाच्या उद्घाटनासाठी आले होते. यावेळी त्यांनी फलंदाजी करताना चांगलीच धुलाई केल्याचं व्हिडिओत दिसत आहे.

दरम्यान, जखमी झालेल्या नेत्याला रिवा येथील संजय गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या डोक्यावर मोठी जखम झाली असून टाके घेण्यात आले आहेत. रिवा शहरातील इटौरा येथील माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन करताना ही घटना घडली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT