Zomato Advt 
Trending News

#BoycottZomato: झोमॅटोच्या जाहिरातीवर जातीयवादाचा आरोप; मोठ्या विरोधानंतर घेतली माघार

यामध्ये लगान सिनेमातील एका कॅरेक्टरचा वापर करणयात आला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Boycott Zomato: बॉयकॉट झोमॅटो ट्विटर ट्रेन्ड सध्या सुरु आहे. झोमॅटोवर जातीयवादी जाहीरात तयार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये लगान सिनेमातील एका कॅरेक्टरचा वापर करण्यात आला आहे. पण याला मोठा विरोध झाल्यानंतर झोमॅटोनं ही जाहिरात मागे घेतली. पण नेमकी झोमॅटोची ही जाहिरात काय आहे आणि त्यात काय म्हटलंय जाणून घ्या? (Boycott Zomato trending on twitter Lagaan movie reference netizens got angry)

काय आहे नेमका वाद?

झोमॅटोनं एक जाहिरात ट्विटरवरुन प्रसारित केली आहे. या जाहिरातीत त्यांनी आमिर खानच्या लगान चित्रपटातील कचरा नावाचं पात्र ज्या कलाकारानं साकारलं आहे हा कलाकार यामध्ये दिसतो. या व्हिडिओच्या सुरुवातीलाच इंग्रजीत KACHRA can change the game असा शब्द दिसतो. त्यानंतर पुढच्या स्लाईडमध्ये म्हणून झोमॅटो कचरा रिसायकलिंग करतो अशी स्लाईड दिसतेय.

त्यानंतर पुढच्या स्लाईडमध्ये हा कलाकार म्हणतो की तुम्ही माझ्याविषयी बोलत आहात का? यानंतर पुन्हा एक स्लाईड येते आणि त्यात 'कचरा भी खेलेगा' अशी लाईन येते. त्यानंतर जेव्हा कचरा रिसायल होतो त्यापासून अनेक गोष्टी तयार होतात, अशी स्लाईड दिसते. या रिसायकल कचऱ्यापासून टेबल तयार होतो, हँड टॉवेल तयार होतो, नाईट लॅम्प तयार करता येतो, फ्लॉवर पॉट तयार होतो, लिहिण्याचा पेपर तयार होतो, पेपर वेट तयार होतो, वॉटरिंग कॅन तयार होतो, जॅकेट तयार होतं अशा एकामागून एक स्लाईड तयार होतात.

विशेष म्हणजे या प्रत्येक स्लाईडमध्ये या सर्व रिसायकल्ड वस्तू म्हणून कचरा नावाच्या कलाकारानं अभिनय केला आहे. त्यानंतर पुढच्या स्लाईडमध्ये शेवटी लगान सिनेमाचा संदर्भ देताना जेव्हा या कचरानं भारताला जिंकून दिलं होतं. यानंतर आता हाच कचला पृथ्वीला जिंकून देईल, अशा आशयाची पुढची स्लाईड दिसते. झोमॅटोनं अशा प्रकारे २० मिलियन किलो प्लास्टिक कचरा रिसायकल केला असल्याची स्लाईड येतो. (Zomato latest news)

झोमॅटोच्या जाहिरातीवर आक्षेप

दरम्यान, या जाहिरातीवर अनेकांनी आक्षेप घेतला असून लगान सिनेमात ज्या कलाकारानं कचरा हे पात्र साकारलं आहे, ते पात्र समाजातील एक जात विशेष म्हणून सिनेमात दाखवण्यात आलं होतं. त्यामुळं झोमॅटोनं कचऱ्याच्या पुर्नवापराबाबत जाहिरात करताना या जात विशेषाचा वापर केला.

त्यामुळं लगान सिनेमाचा संदर्भ देताना झोमॅटोनं जातीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. त्यामुळं याला विरोध करण्यासाठीचे अनेक ट्विट्स बॉयकॉट झोमॅटोनं ट्विटरवर सकाळपासूनच पडायला लागले आहेत. त्यामुळं सुमारे ४६०० ट्विट्ससह बॉयकॉट झोमॅटोनं हा ट्रेन्ड सध्या ट्विटरवर पहायला मिळतो आहे. ((Latest Marathi News))

मोठ्या विरोधानंतर झोमॅटोची माघार

मोठ्या विरोधानंतर झोमॅटोनं आपली ही जाहिरात मागे घेतली असून ट्विटरवरुन तसं निवेदन जाहीर केलं आहे. या निवेदनात झोमॅटोनं म्हटलं की, जागतीक पर्यावरण दिनानिमित्त आम्ही कचऱ्याबाबत जनजागृती करण्यासाटी तसेच प्लास्टिक कचरा रिसायकल करण्याचा संदेश देण्यासाठी विनोदी पद्धतीनं जाहिरात तयार केली होती. पण अनावधानानं याद्वारे आमच्याकडून काही समाजाच्या आणि व्यक्तींच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळं आम्ही हा व्हिडिओ मागे घेत आहोत, असं झोमॅटोन आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Devayani Farande : नाशिकच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून महापालिकेत आरोप-प्रत्यारोप: आमदार फरांदे यांनी अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी केली

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Pune News : खडकमाळ आळीतील खड्ड्यांचे ‘मनसे’कडून हार-फुले वाहून पूजन

Maharashtra Politics: माळेगावच्या अध्यक्षपदी अजित पवार तर उपाध्यक्षपदी संगीता कोकरे यांची निवड

SCROLL FOR NEXT