Viral Video Sakal
Trending News

Viral Video : गाय-बैलाची अनोखी लव स्टोरी; विकलेल्या गायीच्या पाठीमागे बैल धावला अन्...

शेतकऱ्याने गाय विकली अन् व्याकूळ झालेला बैल टेम्पोमागे धावत राहिला

सकाळ डिजिटल टीम

आपण खूप प्रकारच्या प्रेम कहाण्या ऐकल्या असतील. काही लोकांच्या गोष्टी आणि त्यांनी आपल्या जोडीदारासाठी केलेला त्याग पाहून आपण अनेकदा भावनिक झाला असाल. तर काही लव्ह स्टोरी आपल्या कायम लक्षात राहतात. पण प्राण्यांमध्येही आपल्या आवडत्या जीवाविषयी खूप प्रेम असतं.

आपल्या घरातील पाळीव प्राण्यांवरूनच त्यांच्यातील प्रेमाची अनुभूती आपल्याला आली असेल. सध्या एका बैलाचा आणि गायीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या दोघांच्या लव्ह स्टोरीचा व्हिडिओ पाहून आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

या व्हिडिओमध्ये एका शेतकऱ्याने गायीची विक्री केली असून खरेदी करणारा व्यक्ती गायीला टेम्पोमध्ये घेऊन जात आहे. तर टेम्पो उभा असताना एक बैल टेम्पोतील गायीकडे पाहून व्याकूळ झालेला आहे. तो गाडीभोवती गाडीकडे पाहत फेऱ्या घालत आहे. गाडीमधील ड्रायव्हरजवळ जाऊन त्याच्याकडेही आशेने पाहत आहे.

टेम्पो पुढे गेल्यावर बैल गाडीच्या पाठीमागे गायीसाठी धावताना दिसत आहे. बैल आणि गायीमध्ये ताटातूट होत असल्याचं पाहून आपल्याही पोटात कालवाकालव होईल. पण या लव्ह स्टोरीचा शेवट चांगला झाला आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गाय खरेदी केलेल्या व्यक्तीने ती गाय सदर शेतकऱ्याला परत केली असून तो बैल आणि गाय एका गोशाळेत एकत्र राहत आहेत. पण प्राण्यांमधील अनोखी प्रेमकहाणी पाहून आपणही भावनिक व्हाल. गायीसाठी व्याकूळ झालेला बैलाला पाहून इंस्टाग्रामवरील या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजित पवारांच्या अपघात प्रकरणी रोहित पवारांचे नवे आरोप, कोण आहेत श्वेता सिंह?

लाडकी बहीण तर आहेच... आता येणार 'लाडकी विहीण योजना'; प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री मुख्य भूमिकेत

Latest Marathi News Live Update : पुणे महानगरपालिकेकडून अनाधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू..

Pemgiri Fort Trek: ट्रेकिंग आणि इतिहास दोन्हीची मजा हवीये? मग शहाजी भोसले यांच्या काळाशी जोडलेला ‘हा’ किल्ला नक्की पाहा

Love Marriage Tragedy : चौदा वर्षांपूर्वी प्रेमविवाह, ४ वर्षांपूर्वी सुखी संसाराला संशयाचे ग्रहण; परिणिती, शिवम झाले पोरके, प्रेमाचा भयानक शेवट

SCROLL FOR NEXT