Chandrayaan-3 Landing Marathi News Sakal
Trending News

Chandrayaan-3 Landing: विज्ञानाच्या यशासाठी देवाकडे साकडं! चांद्रयान मोहीम यशस्वी होण्यासाठी सर्व धर्मांची प्रार्थना

Chandrayaan-3 Landing Marathi News: विज्ञानाचा उत्कृष्ट नमुना आणि भारताची ही महत्त्वकांक्षी मोहीम यशस्वी होण्यासाठी सगळ्या धर्माच्या नागरिकांकडून आपापल्या देवाला साकडे घालण्यात येत आहे.

दत्ता लवांडे

Chandrayaan-3 Landing Marathi News : बहुचर्चित आणि देशाचे लक्ष असलेले चांद्रयान-३ आज चंद्रावर उतरेल. या सोहळ्याकडे सर्व देशाचे लक्ष लागलेले आहे.

तर विज्ञानाचा उत्कृष्ट नमुना आणि भारताची ही महत्त्वकांक्षी मोहीम यशस्वी होण्यासाठी सगळ्या धर्माच्या नागरिकांकडून आपापल्या देवाला साकडे घालण्यात येत आहे. मस्जिद, चर्च, मंदिरामध्ये आपापल्या पद्धतीने देवाकडे साकडे घालण्यात आले आहे.

दरम्यान, नागपूर येथील टेकडीला राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या नेत्यांकडून साकडे घालण्यात आले आहे. त्याचबरोबर भव्य यज्ञ सोहळ्याचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर पुण्यातील दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या वतीने आज पहाटेच गणपतीचा अभिषेक करण्यात आला आहे.

यासाठी दूध, दही, विविध फळांचा रस, गणपतीच्या मुकुटावर चंद्रकोर लावत बाप्पाला सजवण्यात आले आहे. त्याचबरोबर मस्जिदमध्येसुद्धा मुस्लीम बांधवांकडून नमाज पढण्यात येत असून चांद्रयान मोहीम यशस्वी होण्यासाठी अल्लाकडे साकडे घालण्यात येतंय.

इस्रोने चांद्रयानाच्या हेल्थबाबत अपडेट दिली आहे. चांद्रयान-3 मोहीम ही नियोजित वेळेनुसार सुरू आहे. सर्व यंत्रणांची नियमित तपासणी सुरू आहे, आणि विक्रम लँडरचा प्रवास अगदी आरामात सुरू असल्याचं इस्रोने म्हटलं आहे. चांद्रयानाच्या मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्समध्ये (MOX) अगदी उत्साहाचं वातावरण असल्याचंही इस्रोने सांगितलं.

इस्रो नासाला मागे टाकेल

चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे, आतापर्यंत हे नासालाही शक्य झाले नाही. रशियाचे लुना-25 हे यान उतरण्याआधीच कोसळल्याने रशियाचे हे स्वप्न भंगले. आता भारताला प्रथम दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याची संधी आहे.

या मोहिमेकडे जगाचे लक्ष लागले आहे कारण चंद्राचा हा भाग अतिशय खडबडीत आहे, तेथे मोठे खड्डे आहेत. त्यामुळे इथे सॉफ्ट लँडिंग करणं मोठं आव्हान आहे. जर भारताचे चांद्रयान-3 येथे सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी झाले तर ते ऐतिहासिक ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT