Viral Video Sakal
Trending News

अवघ्या 12 वर्षांच्या चिमुकलीसहित कार कोसळली तलावात; थरकाप उडवणारा Video Viral

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ : मध्यप्रदेशमधील इंदौर येथे एका पर्यटकाची गाडी तलावात कोसळल्याची घटना घडली आहे. पर्यटनस्थळी फिरायला गेल्यानंतर एका तलावाच्या अगदी जवळ गाडी घेऊन जाणे या पर्यटकाला चांगलंच महागात पडलं असून या गाडीमध्ये १२ वर्षाची मुलगीही असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे.

अधिक माहितीनुसार, इंदौर येथील लोधिया कुंड येथे ही घटना घडली आहे. तैयब अली हे आपली पत्नी झेहरा आणि १२ वर्षांची मुलगी जौनक हिच्यासोबत पर्यटनासाठी आले होते. तर त्यांच्यासोबत आणखी ओळखीचे काही लोकं होतं. यावेळी तैयब यांनी आपली लाल रंगाची कार तलावाच्या अगदी काठावर हँड ब्रेक लावून उभी केली. या गाडीमध्ये त्यांची १२ वर्षांची चिमुकली होती.

काही वेळाने गाडीचा हँडब्रेक निघाला आणि गाडी तलावात कोसळली. गाडीमध्ये चिमुकली असल्यामुळे तिच्या वडिलांनीही तलावात उडी मारली. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या पर्यटकांनी त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उड्या मारल्या आहेत. या घटनेमध्ये मुलीचा आणि तिच्या वडिलांचा जीव वाचला असून त्यांच्यावर तेथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT