Viral Video Sakal
Trending News

Viral Video : प्रत्येक आई सारखीच असते! रागावलेल्या मांजरीने पिल्लाला मारली कानफडात

हा व्हिडिओ पाहून आपल्याला आपल्या आईची आठवण येईल.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी, भावनिक, डान्स, लग्न, सीसीटीव्ही फुटेजचा सामावेश असतो. सध्या एका मांजराचा आणि त्याच्या आईचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्याची काळजी करणारी आई त्याच्या कानाखाली वाजवली आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मांजराचं पिल्लू घराच्या पाठीमागे लपलेलं आहे. हे पिल्लू रूसून बसलेलं आहे. तर त्याला शोधत शोधत त्याची आई येते आणि त्याच्यावर रागावते. ती त्याला रागात काहीतरी बोलत आहे. तर जवळ जाऊन पिल्लाचा कानाखाली फटका लावते. त्यानंतर या पिल्लाला तोंडात धरून उचलून घेऊन जाते.

दरम्यान, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्यालाही आईची आठवण येईल. कारण आपणही कित्येकदा आईचा असा मार खाल्ला असेल. यावरून आपल्याला समजेल की प्रत्येक आई सारखीच असते. मग ती प्राण्यांची असो, पक्ष्यांची असो की माणसांची असो. हा भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT