Cat Video Sakal
Trending News

Cat Video : "एकटाच का खातोय? मला पण दे ना"; मांजराचे मालकाकडे हातवारे, व्हिडिओ पाहून थक्क व्हाल

"म्याँव म्याँव करून काही फायदा नाही, त्याला असे हातवारे करून खायला मागितले पाहिजे"

सकाळ डिजिटल टीम

प्रत्येकाच्या घरात मांजर किंवा कुत्रा असे पाळलेले प्राणी असतात. काही जणांना प्राण्यांचा जास्त लळा असल्यामुळे ते पाळीव प्राण्यांना कपडेसुद्धा घालतात. तर अनेकदा हे पाळीव प्राणी घरातल्या व्यक्तींना कामात मदत करताना दिसतात. माणसांमध्ये राहून प्राणी काही गोष्टी शिकत असतात. सध्या एका मालकाचा आणि त्याच्या मांजरीचा गोड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती घरात बसून काहीतरी खात आहे. त्याच्या शेजारच्या टेबलावर एक मांजर बसलेलं असून ते या व्यक्तीकडे हातवारे करत खायला मागत आहे. त्याचे हातवारे पाहून तुम्हीही थक्क व्हाल. पुढचा पाय उचलून मांजराने तोंडाजवळ नेला आणि "मला खायला दे" असं म्हणत ते हातवारे करताना दिसत आहे. त्याचबरोबर आपल्या पुढच्या पायाने सदर व्यक्तीला सुद्धा खुणावताना दिसत आहे.

दरम्यान, ज्यावेळी मालकाने त्याला खायला दिले त्यावेळी हे मांजर शांत बसले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. "म्याँव म्याँव करून काही फायदा नाही, त्याला असे हातवारे करून खायला मागितले पाहिजे" अशा मजेशीर कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT