Video
Video Sakal
Trending News

Video Viral : सरकारी दवाखान्याचा पराक्रम! थेट ICU वॉर्डमध्ये घुसली गाय

सकाळ डिजिटल टीम

सरकारी कार्यालये किंवा हॉस्पिटलची दुरावस्था झालेलं आपण अनेकदा पाहिलं असेल. अनेक सरकारी कार्यालये धूळखात पडलेले असतात. पण चालू दवाखान्यात जनावरे घुसल्याचं आपण पहिल्यांदा ऐकत असाल. मध्यप्रदेशमध्ये राजगड येथे एका सरकारी दवाखान्यातील ICU वॉर्डमध्ये गाय घुसल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

(Cow enters in ICU ward of government hospital video viral)

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक गाय ICU वॉर्डमध्ये घुसली असून औषधे आणि कचरा घाताना दिसत आहे. तर या घटनेनंतर हॉस्पिटलचा बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून याची दखल हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली आहे.

"आम्ही या घटनेची दखल घेतली असून सुरक्षारक्षक आणि वॉर्ड बॉयविरोधात कडक कारवाई करण्यात आली आहे." असं जिल्हा रूग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. राजेंद्र कटारिया यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ कोरोनावेळी केलेल्या जुन्या ICU वॉर्डचा असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे मनोरंजनाचा साधन झाले असून त्यावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ असून खूप जणांनी शेअर केला आहे.

यावर नेटकऱ्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत. सोशल मीडियावर असे अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. तर व्हायरल झालेले अनेक व्हिडिओ आपल्याला मोठा धडा शिकवून जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT