Viral Video Sakal
Trending News

Video Viral : "आमच्या आत्यानी चांद्रयानाला चाकं बसवलेत, याच्या मामांनी डिझेल भरलंय, त्याचे वडील तर लटकून चंद्रावरच गेलेत"

"आमच्या नानाचा रात्रीच फोन आला होता, चंद्रावर पोहोचलो म्हणून..."

सकाळ डिजिटल टीम

Chandrayaan - 3 : चांद्रयान मोहीम फत्ते करून भारताने जगात आपला डंका वाजवला आहे. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला आणि चंद्रावर उतरणारा चौथा देश म्हणून भारताने नाव मिळवलं आहे. पण चांद्रयानाच्या यशानंतर गावागावात विनोदी चर्चांना उधाण आलं आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये काही मुले विनोदी पद्धतीने चांद्रयानावर चर्चा करताना दिसत आहेत. त्यातील एकजण म्हणतो, "माझे चुलते तिथे झाडून काढायला होते." दुसरा म्हणतो, "माझ्या आत्याने त्याचे चाकं बसवले आहेत." तर तिसरा म्हणतो, "याच्या मामानी त्याच्यात डिझेल भरलंय."

चौथा तर हद्दच पार करतो. म्हणतो, "आमचे नाना तर यानाला लटकून चंद्रावर गेलेत, कालच त्यांनी फोन केला होता, पोहोचलो म्हणून... ते म्हणाले रस्त्याने जाताना खायची लय आबळ झाली." असा विनोदी संवाद या मुलांमध्ये चालू आहे.

दरम्यान, चौथा या गप्पा सुरू असताना थेट आपल्या चंद्रावर गेलेल्या वडिलांना फोन करतो आणि म्हणतो, "मी दिसतोय का तुम्हाला, सांगा बरं मग मी कोणत्या रंगाचा शर्ट घातलाय ते..." या गावातल्या लहान पोरांचा गावरान संवाद ऐकून तुम्ही पोट धरून हसल्याशिवाय राहणार नाहीत.

"चंद्रावर वाळू खूप आहे, आमचे नाना म्हणाले आता सात आठ ट्रक घ्यायचे अन् वाळूचा धंदा सुरू करायचा." असं हा मुलगा यामध्ये म्हणत आहे. या शाळकरी मुलांच्या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रियासुद्धा व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT