Cheetah Viral Video Sakal
Trending News

Cheetah Viral Video : फोटो काय काढतो मिठीत घे रे भावा! चित्त्याने चक्क फोटोग्राफरला मारली मिठी

Cheetah Viral Video: प्राण्यांनाही भावना असतात.

सकाळ डिजिटल टीम

Cheetah Viral Video: मानवाला जशी मानसिक आधाराची गरज असते तशीच प्राण्यांनासुद्धा आधाराची गरज असते. अनेकदा पाळीव प्राण्यांना आपण जीव लावतो.

त्यामुळे त्यांनासुद्धा आपल्या भावना समजतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून एक चित्ता वाईल्डलाईफ फोटोग्राफरला चक्क मिठी मारताना दिसत आहे.

साधारण आपण जंगलात फिरायला गेल्यावर जंगली प्राणी आपल्यावर हल्ला करतात या भितीने आपण गाडीतून खाली उतरत नाही. पण हा व्हिडिओ पाहून आपल्याला धक्का बसेल. चित्ता हा खतरनाक प्राणी आहे, पण त्याने या फोटोग्राफरजवळ येत त्यालाच कुरवाळू लागला आहे. त्यानंतर फोटोग्राफरनेसुद्धा त्याला कुरवाळले आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ पाहून जंगली प्राण्यांनाही मानसिक आधाराची गरज असते हे दिसून येते. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या कमेंट केल्या असून हा चित्ता पाळलेला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. "भावा माझा फोटो कसा काढलास ते दाखव आधी" अशा विनोदी कमेंटसुद्धा या व्हिडिओवर केल्या आहेत.

Figen या ट्वीटरवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून आत्तापर्यंत जवळपास २४ हजार नेटकऱ्यांनी या व्हिडिओला लाईक केलं असून १०० पेक्षा जास्त नेटकऱ्यांनी यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT