Video Viral
Video Viral 
Trending News

सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याची तरूणाकडून विटंबना; तोंडाला सिगारेट लावून... | Video Viral

सकाळ डिजिटल टीम

बिलासपूर : छत्तीसगढमध्ये एका अल्पवयीन मुलाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना घडली आहे. छत्तीसगढमधील बिलासपूर येथील सिपट चौकात ही घटना घडली असून सदर प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक अल्पवयीव मुलगा पुतळ्याच्या जवळ पायऱ्याने जातो. त्याच्या हातात सिगारेट आहे. तो पुतळ्याच्या जवळ जाऊन सिगारेट ओढत आहे. त्याचबरोबर तो सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याच्या चेहऱ्यावर धूर सोडताना दिसत असून त्यांच्या तोंडात सिगारेट धरताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली असून ज्या पुतळ्याची विटंबना केली त्या पुतळ्याच्या पाया पडण्यास भाग पाडले आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये हा तरूण पुतळ्याची स्वच्छता करताना दिसत असून पुतळ्याच्या पाया पडताना दिसत आहे. ज्या मुलाने हा व्हिडिओ शूट केला त्याने पोलिसांना यासंबंधी माहिती दिली असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT