Thief Sakal
Trending News

Video: मॉडर्न रॉबिनहूड! चोरीच्या पैशांचे काय केले? 'या' चोराचे उत्तर होतेय व्हायरल

छत्तीसगड येथील एका चोराचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी या चोराचे रॉबिनहूड म्हणून कौतुक करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Chhattisgarh thief confesses to police: दररोज असंख्य चोरीच्या घटना घडताना दिसतात. काही घटना उघडकीस येतात, तर काही येत नाही. अनेकदा अशा घटनांमध्ये पकडलेल्या चोरांना पश्चाताप होत नाही. मात्र, सध्या एका चोराचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, हा व्हीडिओ पाहिल्यावर तुम्हालाही हसू येईल.

हेही वाचा - वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील एका चोराचा हा व्हीडिओ आहे. चोरी केल्यानंतर पकडल्यावर चौकशी दरम्यान पोलिसांना दिलेली उत्तरं ऐकूण कोणालाही हसू येईल. चोरीच्या पैशांचे काय केले ? असे विचारले असता या पैशांनी गाय, कुत्र्यांना खायला घातले, तसेच गरीबांना ब्लँकेट वाटल्याचे हा चोर सांगतो. या उत्तरावर पोलीस कर्मचारी देखील हसू लागतात.

पत्रकार शुभंकर मिश्रा यांनी या चोराचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हीडिओमध्ये दुर्गचे एसपी अभिषेक पल्लव हे चोराची चौकशी करताना दिसत आहे. यावर उत्तर देताना चोर सांगताना दिसत आहे की, 'मी मित्रांसोबत मिळून चोरी करू लागलो. अडीच लाखांच्या चोरीत मला दहा हजार रुपये मिळाले होते. आधी चोरी करताना चांगले वाटायचे, मात्र नंतर पश्चाताप झाला. मला वाटले हे काम चुकीचे आहे. त्यामुळे चोरीच्या रक्केमचा वापर गाय, कुत्र्यांना जेवण देणे, रस्त्यावरील गरीबांना थंडी वाजू नये म्हणून ब्लँकेट आणि पैसे वाटले.'

सोशल मीडियावर हा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. आतापर्यंत लाखो यूजर्सने हा व्हीडिओ पाहिला आहे. अनेक यूजर्स मॉडर्न रॉबिनहूड, क्रांतीकारी चोर असे म्हणत या चोराचे कौतुक देखील करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कफ सिरप रॅकेटमध्ये खळबळजनक खुलासा, ७०० कंपन्या फक्त कागदावर, अब्जावधींची कमाई; EDचा दावा

IPL Mock Auction : ३०.५० कोटी! कॅमेरून ग्रीन ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू... CSK vs KKR मध्ये कोणी मारली बाजी?

इन्स्टाग्रामवर ओळख अन् प्रेमातून रक्तरंजित शेवट; पतीला सोडून पळून गेलेल्या विवाहित महिलेची निर्घृण हत्या, गुप्तांगात आढळले कापडाचे तुकडे

सिरियातून आलेला तरुण ऑस्ट्रेलियात झाला हिरो; सिडनी हल्यात दहशतवाद्यांची बंदूक हिसकवणारा अहमद कोण?

Akkalkot News:'सलग सुट्ट्यांमुळे स्वामींच्या दर्शनासाठी अलोट गर्दी'; अक्कलकोटमधील वाहतूक व्यवस्था कोलमडली, हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद

SCROLL FOR NEXT