Viral Video 
Trending News

Viral Video: काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या लग्नात पाहुण्यांकडून गोळीबार करत जल्लोष; व्हिडिओ व्हायरल

या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

रायपूर : काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या लग्नात पाहुण्यांकडून गोळीबार करत जल्लोष करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. छत्तीसगडच्या जांगीर-चंपा इथं हा प्रकार घडला आहे. (Chhattisgarh Viral video shows celebratory firing at wedding of son of Congress leader)

पोलिसांच्या माहितीनुसार, काँग्रेसच्या जिल्हा पंचायत कमिटीचा उपाध्यक्ष राघवेंद्र प्रताप सिंह याच्या मुलाचं १० फेब्रुवारी रोजी लग्न सोहळा पार पडला. या सोहळ्यात उपस्थित काही नातेवाईकांकडून आनंद साजरा करताना हवेत गोळीबार केला. याचा व्हिडिओ नंतर सोशल मीडियात व्हायरलं झाला.

याप्रकरणी छत्तीसगड पोलिसांनी कारवाई केली आहे. ज्या पिस्तुलातून हा गोळीबार करण्यात आला, ते पिस्तूल शंतनू सिंह नामक व्यक्तीचं होतं. कारवाईदरम्यान पोलिसांनी एक पिस्तूर आणि ४७ जिवंत काडतूसं जप्त केली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठवला असून यामध्ये पिस्तूल ज्या व्यक्तीच्या मालकीचं होतं त्याचं लायसन्स रद्द करण्याची शिफारस करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधिकारी ए. के. सोनी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT