Hen Sakal
Trending News

Video Viral : जगायचा कंटाळा आलाय! कोंबड्याचा थेट आत्महत्येचा निर्णय; गॅसवर उभं राहत घेतलं पेटवून

मालकाला चखना कमी पडला, कोंबडा स्वत:च फ्राय व्हायला चुलीवर गेला

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये लग्न, डान्स, लहान मुले, प्राणी, सीसीटीव्ही फुटेज, अपघाताच्या व्हिडिओचा सामावेश असतो. पण सध्या एका कोंबड्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून तो थेट गॅसवर जाऊन बसल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका गॅसवर कोंबडा जाऊन उभा राहिल्याचं दिसत आहे. बराच वेळ हा कोंबडा चालू गॅसच्या बर्नरवर (आगीवर) जाऊन उभा राहतो पण त्याला काहीच होत नाही किंवा तो जागचा हलत नाही. हे पाहून आपल्यालाही आश्चर्य वाटेल. हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला असून २ लाख २७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. पण तुमच्या माहितीसाठी, हा व्हिडिओ एडिट केलेला असून हा कोंबडा खरोखर आगीवर जाऊन उभा राहिला नाहीये. पण अनेक नेटकऱ्यांना हा व्हिडिओ खरा असल्याचा भास होतो.

या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यामध्ये, "मालकाला चखना कमी पडला, कोंबडा स्वत:च फ्राय व्हायला चुलीवर गेला, आज्ञा पाळणारा कोंबडा! मालकाने कापण्याआधी स्वत:च शिजण्यासाठी गॅसवर जाऊन बसला, जिवंत कोंबडा स्वत:च बसला आगीवर; म्हणला, माझं गरमागरम तंदूर झाल्यावर खा" अशा कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT