Viral Video Sakal
Trending News

Viral Video : चिकू, केळी टाकून बनवला चहा; नेटकरी म्हणाले, याला जिवंत पकडा रे

या चहाची किंमत २०० रूपये प्रती कप एवढी आहे.

सकाळ डिजिटल टीम

अनेकदा आईस्क्रीम डोसा, चहा भात, वाईन आईस्क्रीम, केकची भजी, आईस्क्रीम भजी, बीअर अंडा भुर्जी असे अनेक वेगवेगळे फूड कॉम्बिनेशन आपण पाहिले असतील. पण सध्या एक वेगळाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चहामध्ये केळी आणि चिकू टाकल्याचं दिसत आहे.

हे आगळं वेगळं फूड कॉम्बिनेशन पाहून तुम्हालाही धक्का बसेल. सदर व्यक्ती तयार करत असलेल्या चहामध्ये केळी आणि चिकू टाकत त्याला चांगलं हलवून घेत आहे. तर त्यानंतर तो चहा गाळून ग्राहकांना प्यायला देत आहे.

"आज आपण फळांचा चहा बनवणार आहोत. हा चहा अजूनपर्यंत जगात कुणीच बनवलेला नाही. हा चहा फक्त आयएएस चहावाल्याकडेच मिळेल. यासाठी आपल्याला केळी, चिकू, साखर हे पदार्थ लागतात. या चहाची टेस्टसुद्धा वेगळीच असते.

हा जगातील सर्वांत वेगळा चहा असल्यामुळे याची किंमत २०० रूपये प्रती कप एवढी आहे." असं चहावाला व्हिडिओमध्ये बोलत आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर आपल्या मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. "या चहावाल्याला जिवंत पकडा रे, अरे चहाची अजून किती वाट लावून ठेवणार आहात" अशा विनोदी कमेंट नेटकऱ्यांनी केल्या असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT