viral video sakal
Trending News

Video Viral: तू कोण? आईनं केला भरपुर मेकअप पण पोरगं काही ओळखेना.. नुसता राडा... व्हिडिओ व्हायरल

स्त्रिया कधीकधी सुंदर दिसण्यासाठी इतका मेकअप करतात की त्यांना ओळखणे कठीण होते.

Aishwarya Musale

स्त्रिया कधीकधी सुंदर दिसण्यासाठी इतका मेकअप करतात की त्यांना ओळखणे कठीण होते. असेच काहीसे एका आईसोबत घडले, जिला तिचे मूल मेकअप केल्यानंतर ओळखू शकले नाही आणि तिच्यासमोर आईची आठवण करून जोरजोरात रडू लागले. या आईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मेकअप केल्यानंतर मुलाला आई ओळखता आली नाही

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक गोंडस लहान मूल आपल्या आईला आठवून रडत आहे, तर त्याची आई मी मम्मी आहे, बेटा, मी मम्मी आहे, असे म्हणत आहे, परंतु तो नाही म्हणत जोरजोरात रडत आहे.

खरं तर, मेकअप केल्यानंतर मुलाला त्याच्या आईला ओळखता येत नाही. व्हिडिओमध्ये आणखी काही महिलाही मुलाला समजावून सांगत आहे की, ही तुझी मम्मी आहे, परंतु मूल हे स्वीकारण्यास नकार देत आहे.

पुढे, जेव्हा आई त्याला आपल्या कुशीत घेते तेव्हा तो आणखी घाबरतो, कारण तो त्याच्या आईला अनोळखी मानत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर visagesalon1 नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे ज्यामध्ये "मुल बोलत आहे, मम्मा कुठे आहे?" लोक या व्हिडिओला लाइक करत आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत.

एका यूजरने लिहिले - “त्याला त्याची साधी आई आवडते. दुसर्‍या युजरने लिहिले- 'बेटा, तू तुझ्या आईला सदैव भूतनी बनवून ठेवशील, कधीतरी परी दिसू दे.' दुसर्‍याने लिहिले- 'तो आईने तोंड धुतल्यानंतरच शांत बसेल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT