Imran Patel  Sakal
Trending News

Video Viral : "असे डॉक्टर पाहिजेत, नाहीतर आमच्यावेळी हातपाय बांधून इंजेक्शन द्यायचे"

सकाळ डिजिटल टीम

आपल्याला इंजेक्शनची भिती वाटते का हो? कधी आजारी पडलो किंवा काहीतरी दुखापत झाली तर सर्वांनाच हॉस्पिटलमध्ये जावं लागतं आणि त्यावेळी इंजेक्शन ही सर्वांत घाबरवणारी गोष्ट समोर येते. इंजेक्शनची सुई पाहिली की अनेकांच्या काळजात धस्स होते. आपल्यालही अनेकदा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर इंजेक्शनची भिती वाटली असेल.

सध्या एका डॉक्टरांंचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ते दोन लहान बाळांना इंजेक्शन देताना दिसत आहेत. पण त्यांची इंजेक्शन द्यायची पद्धत पाहून आपल्यालाही समाधान वाटेल.

इंजेक्शन दिल्याचं त्या लहान चिमुकल्यांना कळत सुद्धा नाही असं कसब या डॉक्टरांनी मिळवलं आहे. सदर डॉक्टर अगोदर या लहान मुलांना गाणे म्हणत हसवायला लावतो आणि त्यांच्यासोबत ओळख बनवतो. त्यानंतर त्यांच्या नकळत त्यांना काहीही त्रास होऊ न देता इंजेक्शन देतो. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान, "असे डॉक्टर पाहिजे, नाहीतर आमच्यावेळी आम्हाला हातपाय धरून इंजेक्शन द्यायचे, मग खाली कितीही बोंबललं तरी काही घेणं देणं नव्हतं, किती गोड लेकरं आहेत हे, या लेकरांना इंजेक्शन कसं देतात हे कळत नाहीये आणि आता टॅक्स कसा कट होतोय हे कळत नाहीये." अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. तर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला पसंती दर्शवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

SCROLL FOR NEXT