Viral  Sakal
Trending News

Viral : 'या' अनोख्या मातृत्वाला सलाम! चिंपाझी सांभाळतेय वाघाचे बछडे; व्हिडिओ पाहून उर भरून येईल

आई कुणाचीही असो ती ग्रेटच असते....

सकाळ डिजिटल टीम

आई ही आई असते. कुणाचीही असो पण आई ग्रेटच असते. प्रत्येक आई आपल्या लेकरांना आपल्या जीवापेक्षाही जास्त जीव लावत असते. पण एखाद्या लहान लेकरांनी आपली आई गमावली तर त्यांचं काय होत असेल? हा विचार केला तर मन सुन्न होते. पण सध्या एका वाघांच्या लहान बछड्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

चिंपाझी या लहान बछड्यांची काळजी घेताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर या पिल्लांना ती आपल्या हाताने दुधाच्या बाटलीतून दूधही पाजत आहे. आपल्या अंगाखांद्यावर घेऊन पिल्लांसोबत खेळतानाही दिसत आहे. एकंदरीत या पिल्लांना चिंपाझीचा चांगलाच लळा लागला असून हे पिल्ले तिला लगडताना दिसत आहे.

वाघाच्या या बछड्यांना आई आहे की नाही यासंदर्भात माहिती समोर आली नाही पण चिंपाझी आणि बछड्यातील नाते पाहून आपलाही उर भरून येईल. कुठल्याही लहान पिल्लाला किंवा लेकराला आईची किंवा माया करणाऱ्या जीवाची गरज असते. वाघांच्या बछड्याला या चिंपाझीच्या रूपाने आईची माया मिळाली आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. माया, प्रेम, सद्भावना, दया हे फक्त मानवच नाही तर प्राणीसुद्धा करू शकतात हे यावरून दिसून येते. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT