Video  Sakal
Trending News

Video : वर्गातच विद्यार्थिनीवर केली आक्षेपार्ह टिप्पणी; शिक्षिकेने विद्यार्थ्याला शिकवला धडा

वर्गात क्लास सुरू असतानाच एक मुलगा मुलीला आक्षेपार्ह भाषेत बोलला होता.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये डान्स, लग्न, सीसीटीव्ही फुटेज यांचा सामावेश असतो. सध्या एका वर्गातील क्लास सुरू असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका विद्यार्थ्याला शिक्षिकेने चांगलाच धडा शिकवला आहे.

वर्गामध्ये शिक्षिका शिकवत असताना त्यांना पाठीमागे एक विद्यार्थिनी उभी असल्याची दिसते. त्यानंतर शिक्षिका तिला "का उभी आहे?" असं विचारतात. तेवढ्यात एक मुलगा "माझ्या शेजारी येऊन बस" असं म्हणतो. त्यावर शिक्षिका चिडतात आणि म्हणतात तुझ्या बहिणीला पण तू असंच म्हणणार का? त्यानंतर सदर विद्यार्थी शांत बसतो.

आपण केलेल्या वाईट कामाचं फळ आपल्याला नक्की मिळतं. आपण एखाद्या मुलीसोबत वाईट वागलो तर आपल्या आई, बहिण, मुलीसोबत कुणी ना कुणी वाईट वागतं असतं. त्यामुळे नीट वागलं पाहिजे. मुलींचा आदर राखला पाहिजे असं शिक्षिका म्हणते.

विद्यार्थ्याने मुलींवर केलेल्या टिप्पणीमुळे त्याला शिक्षिकेने चांगलच खडसावलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या कमेंट केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: वैभव सूर्यवंशीला भारतीय संघात निवडायला हवं! दिग्गज खेळाडूची मागणी; म्हणाले, तो मॅच्युअर नाही असं...

Pune News : पुणे शहराला विषाणूजन्य आजारांचा विळखा; ‘एच १ एन १’ सह ‘एच ३ एन २’ च्‍या रुग्‍णसंख्‍येत वाढ

Deglur Rain : देगलूरात ढगफुटीसदृश्य पाण्याने हाहाकार; अनेक गावे जलमय शेती ही पाण्याखाली, २५ गावांचा संपर्क तुटला

Latest Marathi News Live Updates : सांताक्रूझमधील अकोला पोलीस स्टेशन परिसरात साचलं पाणी

CP Radhakrishnan Meet PM Modi: ‘एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

SCROLL FOR NEXT