Video  Sakal
Trending News

Video : नाग दूध पितो? मिठाच्या रिंगणातून साप बाहेर जातो? या प्रश्नाची उत्तरे इथे मिळतील

सकाळ डिजिटल टीम

किंग कोब्रा हा जगातील सर्वांत खतरनाक सापांपैकी एक मानला जातो. भारतामध्ये नागपंचमीला नागाची पूजा केली जाते. वारूळावर जाऊन नागाला दूध पाजण्याची प्रथा आपल्याला माहिती असेल. तर नागाबद्दल अनेक अफवा सुद्धा पसरलेल्या आहेत. पण साप खरच दूध पितो का? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे.

दरम्यान, Crazy XYZ या युट्यूब चॅनेलवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला असून त्यामध्ये थेट नागाबरोबर प्रात्यक्षिक करून यासंबंधी सत्यता पडताळण्यात आली आहे. साप दूध पितो का? मिठाने केलेल्या रिंगणातून साप बाहेर पडतो का? या प्रश्नांची उत्तरे यामधून मिळणार आहेत.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाळलेल्या सापाला दूध पाजण्याचा प्रयत्न केला जातो पण साप दूध पित नसल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर काही वेळाने त्याच्यासमोर पाण्याची वाटी ठेवली जाते. त्यानंतर नाग पाणी पिताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यावरून नाद दूध पित नसल्याचा दावा यातून केला जात आहे.

काही वेळाने दोन नागाला जंगलात नेऊन मिठाने केलेल्या रिंगणामध्ये सोडण्यात येते पण काही क्षणात या रिंगणामधूनही नाग निघून जाताना दिसत आहेत. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. त्याचबरोबर नागाला दूध पाजण्याचाही प्रयत्न करू नये. नागाला त्रास झाल्यास तो आपल्यावर हल्ला करण्याची दाट शक्यता असते त्यामुळे काळजी घेतली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT