Video Viral Sakal
Trending News

Video Viral : कॉलेजमध्येच विद्यार्थ्यांनी सादर केला 'बाबरी विध्वंस' शो; राम मंदीर, मोदी अन्...

या कार्यक्रमातील सादरीकरणावरून सध्या टीका होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

बंगळुरू : कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यातील एका महाविद्यालयातील कार्यक्रमामधील एका शो मुळे वाद सुरू झाला आहे. येथील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या सांस्कृतीक कार्यक्रमात बाबरी मस्जिद पाडण्याचा प्रसंग दाखवला आहे. या शो मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनासुद्धा दाखवण्यात आलं आहे.

अधिक माहितीनुसार, कर्नाटकातील पुत्तूर येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मंगळवारी कॉलेजमध्ये झालेल्या कार्यक्रमात हा शो सादर केला. यामध्ये बाबर दाखवण्यात आला असून हिंदूंच्या अस्मिता मारण्याचा त्याचा उद्देश असून त्याला भारताला मुस्लीम राष्ट्र बनवण्याचा हेतू असल्याचं यामध्ये दाखवण्यात आलं आहे.

बाबराने राम मंदिर पाडून तिथे बाबरी मस्जिद बनवली. त्यानंतर हिंदू कार्यकर्त्यांनी बाबरी मस्जिद पाडली आणि सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर आयोध्यामध्ये आता भव्य राम मंदिराचे काम सुरू असल्याचं यामध्ये दाखवण्यात आलं आहे. जय श्रीरामच्या घोषणा देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा दाखवण्यात आले असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सदर महाविद्यालयावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर या शो मुळे दोन धर्मातील तेढ वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. यासंबंधित अजून कोणतीही तक्रार पोलिसांपर्यंत पोहचली नसल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Accident: मुंबईत बेस्ट बसचा पुन्हा अपघात, रस्ता ओलांडणाऱ्या दोघांना उडवलं, थरार CCTVमध्ये कैद

Kolhapur Theft Case : ‘पोलिसाच्या घरातील तिजोरी अर्धा किलोमीटर शेतात नेत फोडली; लक्ष्मी पूजनासाठी ठेवलेले पैसे चोरले, कोल्हापुरातील घटना

Chiplun Bribery Case : गरोदर महिलेकडून 4,500 रुपयांची लाच घेणाऱ्या 'त्या' महिला डॉक्टरचे होणार निलंबन? कोर्टाकडून जामीन मंजूर, पण नोकरी धोक्यात?

राज्यातील चार IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, विदर्भातील दोघांचा समावेश, तातडीने कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश

दत्तकपुत्र होता बॉलिवूडचा हा सुपरस्टार ! आईनेच काका-काकूंच्या केलं होतं स्वाधीन; मामाने बदललं आयुष्य

SCROLL FOR NEXT