Rahul Gandhi Bharat Jodo Yatra esakal
Trending News

'How's The Josh'! विद्यार्थ्यांसोबत राहुल गांधींची पळण्याची 'शर्यत'; कार्यकर्त्यांत उत्साह वाढवणारा Video समोर

राहुल गांधींचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवणारा आहे.

सकाळ डिजिटल टीम

राहुल गांधींचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवणारा आहे.

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) अभिनेत्री पूनम कौरचा (Actress Poonam Kaur) हात धरल्यामुळं काँग्रेस नेते राहुल गांधी सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. त्यातच आता राहुल गांधींचा Rahul Gandhi आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. मात्र, हा व्हिडिओ कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवणारा आहे.

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आता तेलंगणात पोहोचलीय. तेलंगणातील (Telangana) या यात्रेचा 5 वा दिवस गोलापल्ली येथून सुरू झाला. त्यात राहुल यांनी शालेय विद्यार्थी (School Students) व कार्यकर्त्यांसोबत धावण्याची शर्यत लावून पदयात्रेकरूंत उत्साहाची पेरणी केली. काँग्रेसनं या शर्यतीचा व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवरही पोस्ट केलाय.

काँग्रेसनं या व्हिडिओसह आजच्या यात्रेच्या प्रवासाची काही छायाचित्रंही ट्विट केली आहेत. अन्याय व द्वेषाविरोधात आवाज उठवावाच लागेल. आम्ही भारताला असेच विखरू देणार नाही, असं कॅप्शन काँग्रेसनं या फोटोंखाली दिलंय. राहुल गांधींनी या यात्रेत आतापर्यंत 1300 किमीहून अधिकचं अंतर पायी कापलं आहे.

पळण्याची शर्यत लावणार का? राहुल गांधींकडून विद्यार्थ्यांना विचारणा

राहुल गांधींनी रविवारी तेलंगणाच्या गोलापल्ली येथून भारत जोडो यात्रेला सुरूवात केली. यावेळी त्यांच्यासोबत काही शालेय विद्यार्थीही सहभागी झाले होते. त्यांनी अचानक या विद्यार्थ्यांना पळण्याची शर्यत लावणार का? अशी विचारणा केली. विद्यार्थ्यांनी होकार दिल्यानंतर ते अचानक त्यांच्यासोबत धावू लागले. ते धावत असल्याचं पाहून त्यांचे सुरक्षा रक्षक, तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी व इतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या मागं धाव घेतली. तेलंगणातील या यात्रेचा आजचा 5 वा दिवस आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : पैठणमधील हर्षी खुर्द येथे सव्वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT