Bharat Jodo Yatra Rahul Gandhi esakal
Trending News

VIDEO : भारत जोडो यात्रेत दिसला राहुल गांधींचा अनोखा अंदाज, बाईक चालवून केली यात्रेला सुरुवात

राहुल गांधींना बाईकवर पाहून नागरिकांमध्ये मोठा उत्साह संचारला होता.

सकाळ डिजिटल टीम

राहुल गांधींना बाईकवर पाहून नागरिकांमध्ये मोठा उत्साह संचारला होता.

Bharat Jodo Yatra News : मध्य प्रदेशातील महू (Madhya Pradesh Mahu) इथं भारत जोडो यात्रेदरम्यान (Bharat Jodo Yatra) राहुल गांधी (Rahul Gandhi) बाईक (Bike) चालवताना दिसले. काँग्रेस नेत्यानं आज महू येथून यात्रेला सुरुवात केली. याठिकाणी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं.

याचवेळी राहुल गांधींना बाईकवर पाहून नागरिकांमध्ये मोठा उत्साह संचारला. त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी एवढी गर्दी केली होती की, सुरक्षा व्यवस्थेत पोलीस दलालाही घाम फुटला. गर्दी हटवून मार्ग काढण्यासाठी पोलिसांना बरीच धडपड करावी लागली.

यात्रामार्गावर बायपासजवळ लाल गालिचा अंथरण्यात आला होता. रंगीबेरंगी कागद उडवून राहुल गांधींचं भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी राहुल गांधी बाईक चालवताना दिसले. त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली होती. राहुल गांधींचा हा अनोखा अंदाज कार्यकर्त्यांना खूप आवडलाय. राहुल गांधी गेल्या दोन महिन्यांपासून भारत जोडो यात्रेत व्यस्त आहेत. हा प्रवास 7 सप्टेंबर 2022 रोजी सुरू झाला आणि जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या दौऱ्यात राहुल गांधी देशाच्या विविध भागांना भेटी देणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update LIVE : पंतप्रधान मोदींचे शपथविधी स्थळावर आगमन

Mumbai News : अंधेरी स्थानकातच तरुणीच्या धर्मांतराचा प्रयत्न? वृ्द्ध करत होता प्रार्थना; प्रवाशानं शूट केला व्हिडीओ

Bharatbhushan Kshirsagar: बीडचे शरद पवार! कोण आहेत भारतभूषण क्षीरसागर? ऐन निवडणुकीत त्यांची एवढी चर्चा का होतेय?

माधुरी दीक्षितचा नवा अंदाज, 'मिसेस देशपांडे' सीरिजमध्ये दिसणार धकधक गर्ल, साकारणार सीरियल किलरची भूमिका

Talaq-e-Hasan Case: मुस्लिमांमध्ये तलाक-ए-हसन म्हणजे काय? ऐकून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशही संतापले, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT