Zomato Zomato Delivery Boy Viral Video Esakal
Trending News

Zomato Delivery Boy: एका डिलिव्हरी मागे किती रुपये मिळतात? झोमॅटो कर्मचाऱ्याचा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल भावनिक

Zomato Delivery Boy Viral Video: हा व्हिडिओ 3 ऑगस्ट रोजी शेअर करण्यात आला होता आणि त्याला आतापर्यंत 73 हजारांहून अधिक लाईक्स आणि व्हिव्ज मिळाले आहेत.

आशुतोष मसगौंडे

झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या एका कंटेंट क्रिएटरने त्याच्या फूड डिलिव्हरी करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये त्याने 30 मिनिटे काम केल्यानंतर त्याला किती पैसे मिळतात हे दाखवले आहे.

हा व्हिडिओ सध्या नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय बनला आहे. काहींनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर डिलिव्हरी बॉयला इतके कमी वेतन दिल्याबद्दल फूड डिलिव्हरी कंपनीला क्रूर म्हटले आहे, तर काहींनी म्हटले की, या कामासाठी कोणत्याही कौशल्याची गरज नाही, त्यामुळे त्याला मिळणारे वेतन योग्य आहे.

या व्हिडिओची सुरुवात डिलिव्हरी बॉयने ऑर्डर स्वीकारल्यापासून होते. त्यानंतर तो रेस्टॉरंटमध्ये जाऊन फडू घेताना दिसतो. अखेरीस, तो फूड डिलिव्हर करण्यासाठी ग्राहकाकडे जातो आणि शेवटी त्याला या डिलिव्हरीचे 20 रुपये मिळालेले दिसतात. ही एक फूड डिलिव्हरी पूर्ण करण्यासाठी त्याला 30 मिनिटे लागली असे त्याने सांगितले.

हा व्हिडिओ 3 ऑगस्ट रोजी शेअर करण्यात आला होता आणि त्याला आतापर्यंत 73 हजारांहून अधिक लाईक्स आणि व्हिव्ज मिळाले आहेत.

इंस्टाग्रामवर मुन्ना कुमारगुड्डू नावाने डिलिव्हरी बॉयने हा व्हिडिओ शेअर केला आहे. तो अनेकदा असे व्हिडिओ शेअर करतो ज्यामध्ये तो विविध डिलिव्हरी सेवा आणि कॅब-हेलिंग कंपन्यांसाठी काम करत असल्याचे दाखवतो. त्याच्या इतर व्हिडिओंमध्ये, त्याने Uber, Porter आणि Swiggy चे प्रत्येक राईडला किती वेतन मिळते हे देखील दाखवले आहे.

Zomato ही एक भारतीय बहुराष्ट्रीय रेस्टॉरंट एग्रीगेटर आणि फूड डिलिव्हरी कंपनी आहे. याची स्थापना दीपेंद्र गोयल आणि पंकज चड्डा यांनी 2008 मध्ये केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: देहविक्रीसाठी विदेशी महिलांचा वापर; अकोल्यात उच्चभ्रू सोसायटीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Nagpur News: बेपत्ता अथर्वचा मृतदेहच सापडला;गिट्‍टीखदान येथून झाला होता बेपत्ता, भरतवाडा रेल्वे पुलावर आढळला मृतदेह

काय? मृणाल ठाकूरला खरंच अटक झाली? पोलिसांनी हातात बेड्या घातल्याचा सोशल मीडियावर Viral Video

AAP Raghav Chadha Controversy : राघव चढ्ढा यांनी पंतप्रधान मोदी अन् भाजपविरोधी पोस्ट डिलिट केल्या, 'आप' नेते सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा

सोनम कपूरने बाळाला जन्म दिल्यानंतर मानले संपूर्ण स्टाफचे आभार ! सोशल मीडियावर लिहिली खास पोस्ट

SCROLL FOR NEXT