MS dhoni Sakal
Trending News

MS Dhoni Video : धोनी बनला 'रॉयल शेतकरी'; शेतात ट्रॅक्टरने करतोय नांगरणी

तो शेत नांगरताना या व्हिडिओत दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

क्रिकेटच्या विश्वात आपल्या खेळीने आणि नेतृत्वाने भारताना उच्च स्थानावर नेऊन ठेवणारा महेंद्रसिंह धोनी सध्या आपलं आयुष्य आरामात घालवत आहे. सध्या त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तो शेतात ट्रॅक्टरवर बसून नांगरताना दिसत आहे. यापूर्वी तो दुबईत गेला होता.

हेही वाचा - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

सध्या धोनीचा शेतातील व्हिडिओ व्हायरल होत असून तो यामध्ये स्वराज 963 या ट्रॅक्टरवर बसून नांगरणी करत आहे. तर त्याच्याबरोबर एक व्यक्ती बसलेला आपल्याला दिसत आहे. त्याने बऱ्याच मोठ्या शेताची नांगरणी केल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. त्याने झारखंड येथील रांची येथे शेती सुरू केल्याची चर्चा होत आहे. तर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान, धोनी याने काही वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवत्ती घेतली असून उरलेला वेळ तो आपल्या कुटुंबासोबत आणि नवनवीन कामे करण्यासाठी वापरत आहे. काही दिवसांपूर्वी तो आपली मुलगी आणि बायकोसोबत दुबईला गेला होता. त्यावेळी तेथील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : भुसावळमध्ये संत गाडगेबाबा कॉलेजच्या बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT