Animal Video Sakal
Trending News

Viral Video : आधी हरणाने खाल्ला साप, आत्ता जिराफ खातेय हाडं; अचानक शाकाहारी प्राणी मांसाहारी कसे बनले?

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

अनेक जंगली प्राणी शाकाहारी असतात. ते फक्त झाडपाला खाऊन जगतात. तर काही प्राणी फक्त मांसाहारी असतात ते इतर प्राण्यांना खाऊन आपली भूक भागवत असतात. पण सध्या आपल्याला माहिती असलेले शाकाहारी प्राणी मांसाहारी बनलेले दिसतील. यासंदर्भातील दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

व्हायरल होत असलेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये एक हरीण सापाला खात आहे. हे दृश्य पाहून आपल्यालाही धक्का बसेल. हरीण सापाला खाऊ शकतो हा विचारही आपल्या डोक्यात कधी आला नसेल पण सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तर दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये जिराफ हाड चघळताना दिसत आहे.

सुसांता नंदा या ट्वीटर अकाउंटवरून हे दोन्ही व्हिडिओ शेअर करण्यात आले आहेत. पण हे शाकाहारी प्राणी मांसाहारी कसे बनले? असा प्रश्न आपल्याला पडला असेल. हा व्हिडिओ शेअर करताना नंदा यांनी लिहिलं आहे की, "जिराफ शाकाहारी असतात. ते झाडांच्या पानापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या लांब मानेचा वापर करतात. परंतु कधीकधी ते फॉस्फरस मिळविण्यासाठी हाडे चघळतात आणि खातात. निसर्ग अद्भुत आहे!” असं त्यांनी लिहिलं आहे.

तर हरणाच्या व्हिडिओवर त्यांनी लिहिलं की, "निसर्गाची अद्भुत किमया समजण्यासाठी तुमचा कॅमेरा मदत करतो" असं कॅप्शन त्यांनी लिहिलं आहे. हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले असून अनेकांनी त्यावर आपल्या कमेंट केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अजित पवारांच्या अपघात प्रकरणी रोहित पवारांचे नवे आरोप, कोण आहेत श्वेता सिंह?

लाडकी बहीण तर आहेच... आता येणार 'लाडकी विहीण योजना'; प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री मुख्य भूमिकेत

Pemgiri Fort Trek: ट्रेकिंग आणि इतिहास दोन्हीची मजा हवीये? मग शहाजी भोसले यांच्या काळाशी जोडलेला ‘हा’ किल्ला नक्की पाहा

Love Marriage Tragedy : चौदा वर्षांपूर्वी प्रेमविवाह, ४ वर्षांपूर्वी सुखी संसाराला संशयाचे ग्रहण; परिणिती, शिवम झाले पोरके, प्रेमाचा भयानक शेवट

Nagpur Accident: नागपूरमध्ये कबड्डीपटूंना बुलेट स्टंटबाजी नडली, मैदान गाजवलं पण रस्त्यावर हरले; दोघांचा अंत, युवती जखमी!

SCROLL FOR NEXT