Viral VIdeo Sakal
Trending News

Video Viral : आयव! हरणानं राम कृष्ण हरी ऐकलं अन् उड्या मारायला लागलं

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सध्या सोशल मीडियावर हरणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये ते राम कृष्ण हरीच्या गजरात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळत आहे. एका गावात हरिपाठ सुरू असताना एक हरणाचं पिल्लू त्या ठिकाणी आलं आणि राम कृष्ण हरीच्या गजरावर उड्या मारू लागलं आहे.

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. वारकरी सांप्रदायातील मुलं हरिपाठ सुरू असताना ज्या प्रकारे पावल्या खेळत आहेत. ते पाहून हरणाचं पिल्लूसुद्धा त्यांचं अनुकरण करू लागल्याचं दिसत आहे. तर ते भान हरपल्यासारखं उड्या मारताना दिसत आहे.

दरम्यान, या व्हिडिओमध्ये विजय वडेट्टीवार यांची मुलगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार हरिपाठामध्ये पावल्या खेळत आहेत. त्यासुद्धा डान्स करणाऱ्या हरिणाचा आनंद घेत आहेत. त्यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओर अनेकांनी आपल्या कमेंट केल्या असून मोठ्या प्रमाणावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. "राम कृष्ण हरी, हरिपाठामध्ये तल्लीन झालेले हरणाचं पिल्लू, मुक्या प्राण्यांनासुद्धा टाळ मृदंगाचा आवाज अनुभवता येतो" अशा प्रकारच्या कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT