Viral VIdeo Sakal
Trending News

Viral Video : "माझ्या बाळाला वाचवा रे..." हरिणीची आर्त हाक; मदतीसाठी रस्ता अडवत थांबवली गाडी

आई ही आईच असते... या हरिणीचा व्हिडिओ पाहून आपल्या डोळ्यात पाणी येईल

सकाळ डिजिटल टीम

आई ही आईच असते... ती मग प्राण्यांची असो की माणसांची. आपल्या बाळासाठी ती प्राणही देऊ शकते. आपल्याला कोणत्याही अडचणीच्या काळात किंवा संकटाच्या काळात आईची आठवण येत असते. त्याचप्रकारे आपलं लेकरू हे प्रत्येक आईसाठी काळजाचा तुकडा असते. सध्या एका आईचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडिओमध्ये एक हरिणीने आपल्या बाळाला वाचवण्यासाठी रस्त्यावरील गाड्यांना थांबवल्याचं दिसत आहे. गाडीतील व्यक्तीने हरिणीला बाजूला सारण्याचा प्रयत्न केला पण हरिणी जागेवरच थांबून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्यक्तीच्या लक्षात आलं.

"माझ्या बाळाला वाचवा" अशी तिची आर्त हाक गाडीतील एका व्यक्तीला ऐकू आली आणि हरिणीने गाडीतील व्यक्तीला आपल्या पिल्लाकडे नेलं. हरिणीचं पिल्लू एका जाळीमध्ये अडकलं होतं. त्याला बाहेर निघता येत नव्हतं.

हा व्यक्ती गेला आणि त्याने या पिल्लाला बाहेर काढलं. तेव्हा हरिणी नि:शब्द झाली. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून एका आईचं समाधान काय असतं हे आपल्याला दिसेल. हरिणीचं पिल्लूही या व्यक्तीकडे केविलवाण्या नजरेने पाहत होता. चार पाय टेकून जमीनीवर बसून या पिल्लाने सदर व्यक्तीचे आभार मानले आहेत.

हा भावनिक व्हिडिओ पाहून प्रत्येक आईला आपल्या पिल्लाबाबत किती काळजी असते याचं दर्शन होईल आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच शेअर केला जात असून अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या कमेंट केल्या आहेत. ट्वीटरवरील हम लोक we the people या अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT