Video  Sakal
Trending News

Video : भररस्त्यावर सशस्त्र दरोडा टाकणारे 5 आरोपी जेरबंद; गाडी अडवत केली होती लूट

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली : दिल्लीत भरदिवसा चार गुंडांनी एका उद्योजकाला लुटल्याची घटना घडली होती. भरसस्त्यात दिवसा कार अडवून बंदुकीचा धाक दाखवून गुंडांनी दरोडा टाकला होता. त्यानंतर गुन्हे शाखेने यातील पाच आरोपींना अटक केली आहे. ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

अधिक माहितीनुसार, इंडिया गेटला रिंग रोडने जोडणाऱ्या प्रगती मैदान टनेलजवळ ही घटना घडली. डिलीव्हरी एजंट दोन लाख रूपयांची रोकड घेऊन गुरूग्रामला जात असताना दोन दुचाकीवरून चार दरोडेखोर आले आणि भर रस्त्याच्या मध्येच चारचाकी गाडीला थांबवत बंदुकीचा धाक दाखवून पैशांची बॅग घेऊन गेले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.

दरम्यान, काल ही घटना घडल्यानंतर दिल्लीत आप आणि भाजप मध्ये एकमेकांवर टीकास्त्र सुरू झालं होतं. तर रात्रीपासून पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी करत आरोपींचा शोध सुरू केला होता. आज पाच आरोपींना अटक केली असून अधिक तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची भीषण धडक; ११ जणांचा जागीच मृत्यू; कल्याण अहिल्यानगर हायवेवर दुर्घटना

'अरे किती ते अज्ञान' अभिनेत्रीनं आशाताईंना श्रद्धांजली वाहताना पोस्ट केला लताताईंचा फोटो, नेटकरी ट्रोल करत म्हणाले...'अरे काय हे...'

Babasaheb Ambedkar Birth Anniversary : पिंपरी चिंचवड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त उद्या वाहतुकीत बदल; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

iPhone 15 मिळतोय फक्त 35 हजारात; खरेदीसाठी उडाली झुंबड, कशी काय सुरुय ही धमाकेदार ऑफर? पाहा कुठे बूक करायचा

MI vs RCB: विराट कोहलीवर BCCI करणार कारवाई? रागाच्या भरात केले 'ते' कृत्य... मग फिल्डिंगला पण आला नाही

SCROLL FOR NEXT